मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहिण कायम कोणत्याही मुद्द्यावर आपलं परखड मत मांडतात. नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या या बहिणींच्या आडचणीत वाढ असल्याचं दिसून येत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना कामय चर्चेत होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोलीला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
Mumbai: Kangana Ranaut and Rangoli Chandel summoned by Police, asking them to appear before Bandra Police on 23-24 Nov over "objectionable comments on social media to spread communal tension between 2 groups."
Case registered following Bandra Metropolitan Magistrate court order. pic.twitter.com/I0SUivqfVm
— ANI (@ANI) November 18, 2020
याआधी कंगनाने पोलिसांच्या समन्सला दोनदा केराची टोपली दाखवली आहे...त्यामुळे आता कंगना या तरी समन्सला रिपॉन्स देत चौकशीसाठी मुंबईत येणार का याकडे लक्ष आहे. कंगना आणि तिची बहिण रंगोली यांना २३ आणि २४ नोव्हेंबरला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स पाठवण्यात आला आहे.
या दोघींनी आपल्या भावाच्या लग्नकार्यात व्यस्त असल्याचे सांगत चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ ((अ) १५३ (अ) आणि १२४ (अ) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. कास्टिंग दिग्दर्शक साहिल अशरफ सैयद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे कोर्टाने कंगना आणि रंगोलीविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.