बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिला जे वाटेल ते ती मोकळ्या मनानं सगल्यांसमोर मांडताना दिसते. कोणत्याही व्यक्ती विरोधात किंवा कोणत्या गोष्टीच्या विरोधात तिला काही बोलायचं असेल तर ती मोकळे पणानं बोलताना दिसते. आता तर तिनं थेट पॅरिस ओलंपिकवर निशाणा साधला आहे.
पॅरिस ओलंपिक 2024 ची एक सुंदर सुरुवात झाली आहे. जगातल सगळ्यात मोठ्या खेळाच्या या स्पर्धेवर सगळ्यांचं लक्ष आहे. एकीकडे पॅरिस ओलंपिकच्या ओपनिंग सेरेमनीची सगळ्यांनी सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे कंगनानं मात्र त्यावर आक्षेप घेतला आहे.
कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कंगनानं सांगितलं की त्यात तिला काय नाही आवडलं. कंगनानं या ओपनिंग सेरेमनीच्या इव्हेंट्समधल्या सगळ्यात शेवटच्या 'द लास्ट सपर' अॅक्टचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. त्यात एका लहान मुलीला घेतल्यामुळे तिनं आक्षेप घेतला होता. इन्स्टाग्रामवर या संबंधीत स्टोरी शेअर करत तिनं लिहिलं की 'पॅरिस ओलंपिकनं हायपर सेक्शुअलाइज्ड अॅक्ट द लास्ट सपरमध्ये लहान मुलीचा सहभाग करुन घेतला होता. इतकंच नाही तर, तिला एका निर्वस्त्र असलेल्या एका व्यक्तीला दाखवण्यात आलं, त्या व्यक्तीला निळ्या रंगानं पेन्ट करण्यात आलं असून ती व्यक्ती येशू असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा खिल्ली उडवली आहे. वामपंथिंनी 2024 च्या ओलंपिकला हायजॅकल केलं आहे.'
त्यानंतर कंगनानं आणखी एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केल. ज्यात एका व्यक्तीनं निळ्या रंगानं पेन्ट करण्यात आलं होतं. त्यासोबत कंगनानं लिहिलं की 'पॅरिस ओलंपिक सेरेमनीमध्ये निर्वस्त्र असलेल्या या व्यक्तीला येशू दाखवण्यात आलं आहे.'
दरम्यान, कंगना इथेच थांबली नाही तर तिनं आणखी एक पोस्ट शेअर केली. ज्यात एक महिला मान हातात घेऊन उभी आहे. त्याविषयी कंगनानं लिहिलं की अशाच प्रकारे फ्रान्सनं ओलंपिक 2024 चं स्वागत केलं आणि अशा प्रकारच्या गोष्टींचे संदेश लोकांना देण्यात आले? सॅटनच्या जगात तुमचे स्वागत आहे? त्यांना सगळ्यांना हेच दाखवायचं होतं?
कंगनानं एका फोटो कोलाज शेअर करत लिहिलं आहे की ओलंपिकची ओपनिंग सेरेमनी ही संपूर्ण होमोसेक्शुअॅलिटीलक आधारित होती.
त्याविषयी कंगना म्हणाली, 'मी होमोसेक्शुअॅलिटीच्या विरोधात नाही पण, मला एक कळलं नाही की ओलंपिक सेक्शुअॅलिटीशी कसं संबंधित असू शकतं? मानवी उत्कृष्टतेचा दावा करणाऱ्या सर्व देशांमध्ये लैंगिकतेचा खेळांमध्ये सहभाग का घेतला आहे? सेक्शुअॅलिटी ही फक्त आपल्या बेडरूमपर्यंत मर्यादित का असू शकत नाही? ही राष्ट्रीय ओळख का बनली आहे?'