काही तरी घेत जा गं बाई... चाहत्यांना करिनाची काळजी!

करिनाची फिगर पाहून अनेक सोशल मीडिया युझर्सनं करिनाला ट्रोल करायला सुरुवात केली

Updated: May 11, 2018, 06:24 AM IST
काही तरी घेत जा गं बाई... चाहत्यांना करिनाची काळजी! title=

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनसाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स हजर झाले होते. अभिनेत्री करिना कपूरही आपली बहिण करिश्मा कपूर आणि पती सैफ अली खान यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या सोहळ्यासाठी करीनानं मनीष मल्होत्रानं डिझाईन केलेली सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती. या कार्यक्रमातले करिनाचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर मात्र काही चाहत्यांना करिनाची काळजी वाटू लागलीय. 

करिनाची फिगर पाहून अनेक सोशल मीडिया युझर्सनं करिनाला ट्रोल करायला सुरुवात केली. अनेकांनी तर न मागतच करिनाला अनेकविध प्रकारचे सल्लेही देऊन टाकले. एका युझरनं लिहिलं... 'तुला माहित आहे का की तू कशी दिसतेय?' दुसऱ्यानं लिहिलं 'करिना तू आजारी दिसतेयस' तर तिसऱ्यानं म्हटलं 'तू म्हातारी दिसतेयस' तर आणखी एकानं तर तिला 'कुपोषित' म्हणत 'काही तरी घेत जा गं बाई' असंही म्हणून टाकलंय. 

@manishmalhotra05 @mmalhotraworld

को Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) द्वारा साझा की गई पोस्ट

At @sonamkapoor and @anandahuja wedding Reception

को Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) द्वारा साझा की गई पोस्ट

@mmalhotraworld

को Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) द्वारा साझा की गई पोस्ट

Wearing @mmalhotraworld for @sonamkapoor and @anandahuja Wedding Reception, Styled by @tanghavri

को Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) द्वारा साझा की गई पोस्ट

#fulloflove

को Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) द्वारा साझा की गई पोस्ट

करिना सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. करिना आपल्या लूक आणि फिगरबाबत जरा जास्तच सजग दिसते. लग्नापूर्वीही करिना आपल्या झिरो फिगरसाठी खूपच चर्चेत होती. गरोदरपणानंतरही करिनानं काही दिवसांतच 12 किलो वजन कमी केलं होतं. तिचा 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा येत्या 18 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.