Bhool Bhulaiyaa 3 Teaser: 'क्या लगा कहानी खत्म हो गई?' सिंहासनासाठी परतली मंजुलिका! 'भूल भुलैया'चा थरकाप उडवणारा टीझर पाहा

Bhool Bhulaiyaa 3 Teaser : 'भूल भुलैया 3' मध्ये आता काय पाहायला मिळणार... टीझरमुळे एकच चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Sep 28, 2024, 11:14 AM IST
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: 'क्या लगा कहानी खत्म हो गई?' सिंहासनासाठी परतली मंजुलिका! 'भूल भुलैया'चा थरकाप उडवणारा टीझर पाहा title=
(Photo Credit : Social Media)

Bhool Bhulaiyaa 3 Teaser : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात आता या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन देखील दिसणार आहे. खरंतर या चित्रपटातून ती पुन्हा एकदा 'भूल भुलैया' फ्रेंचायझीमध्ये येणार आहे. चित्रपटातील तिचा लूक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असताना टीझरनं सगळ्यांना वेड लावलं आहे. 

कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या सुरुवातीला विद्या बालनचा आवाज ऐकायला येतोय. यात ती बंगाली भाषेत काही बोलताना दिसते. त्यानंतर एक नवरदेव जमिनीत जात असल्याचे दिसते. त्यानंतर स्क्रीनवर अचानक मंजुलिका झालेली विद्या बालन दिसते. या मंजुलिकाला सिन्हासनाची भूक असते. ती सतत बोलताना दिसते की सिंहासन हे तिचं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्यानंतर कार्तिक आर्यन अर्थात रुह बाबाचा आवाज ऐकायला येतोय. रुह बाबा बोलतो की तुम्हाला काय वाटलं गोष्ट संपली? दरवाजे तर बंद होतात. या आशेनं की एक दिवस ते उघडतील. त्यानंतर तो स्क्रीनवर राख फुकताना दिसतो. जर तुम्ही 'भूल भुलैया 2' पाहिला तर तुम्हाला रूह बाबाचं सत्य माहित आहे. अशात तो आजही तेच म्हणतो की भूतवगैरे काही नसतं. पण जेव्हा आता त्याचा सामना हा एक नाही तर अनेक अतृप्त आत्मांशी सामना होणार आहे. तर नेमकं पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर मध्येच तृप्ती डिमरीची एक झलक पाहायला मिळत आहे. कार्तिक आर्यन आणि तृप्तीचा रोमांस देखील पाहायला मिळत आहे. कार्तिक आर्यनसोबत ती देखील आत्मांचा सामना करताना दिसणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष याकडे लागले आहे की यावेळी रुह बाबा नक्की काय कमाल करणार आहे. 

हेही वाचा : 'अमजद खान यांना 'कितने आदमी थे?' डायलॉग मीच शिकवला! अख्खा 'शोले' रमेश सिप्पींनी डायरेक्ट केलेला नाही'

दरम्यान, 'भूल भुलैया 3' मध्ये राजपाल यादव, संजय मिश्री आणि अश्विनी कलसेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक अनीस बज्मीचा हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपट थिएटरमध्ये 'सिंघम 3' सोबत क्लॅश होणार आहे.