विकी-कतरिनाचा शाही विवाहसोहळा अचानक रद्द, आता करणार कोर्ट मॅरेज?

तेव्हापासून दोघांचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

Updated: Nov 24, 2021, 01:56 PM IST
विकी-कतरिनाचा शाही विवाहसोहळा अचानक रद्द, आता करणार कोर्ट मॅरेज? title=

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या बातम्यांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांच्या वेडिंग डेस्टिनेशन ते गेस्ट लिस्टच्या बातम्या येत आहेत. दोघेही सवाई माधोपूर (राजस्थान) येथील सिक्स सेन्सेस फोर्टवर 7 ते 9 डिसेंबर दरम्यान सात फेर्‍या घेणार असल्याचे वृत्त आहे.

तेव्हापासून दोघांचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्यात आता येणारी बातमी चाहत्यांना आणखी आश्चर्यचकित करू शकते.या दोघांच्या लग्नाशी संबंधित एक रोमांचक बातमी मिळाली आहे.

विकी आणि कतरिना राजस्थानच्या आधी मुंबईत लग्न करणार असल्याची माहिती बॉलिवूड लाईफला सुत्रांकडून मिळाली आहे. होय, हे खरे आहे. दोघांची जोडीही राजस्थानपूर्वी मुंबईत लग्न करणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

कतरिना कैफच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, विकी आणि कतरिना पुढील आठवड्यात राजस्थानमधील शाही विवाहापूर्वी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत.

ही बातमी समोर आल्यानंतर एकीकडे हे कपल शाही विवाहसोहळा रद्द करणार का अशी ही चर्चा रंगते आहे. तर दुसरीकडे लग्न आटोपून दोघेही जयपूरला रवाना होतील. तेथून आम्ही लग्नाचे ठिकाण, सवाई माधोपूरकडे रवाना होऊ. यासाठी दोघांनीही तयारी सुरू केली आहे. असं ही बोललं जात आहे.

लग्नाच्या तयारीसाठी कतरिनाने आपल्या कामातून ब्रेक घेतल्याचं बोललं जात होतं. लग्नाच्या तयारीसाठी कतरिना सतत विकी आणि त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात असते.

त्याच वेळी, विकी अजूनही त्याच्या प्रोजेक्ट्ससाठी शूटिंग करत आहे. विकीची आई वीणा कौशल आणि भाऊ सनी कौशल कतरिनाला लग्नाच्या तयारीत साथ देत आहेत. लग्नाआधी हे कपल त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणाही करणार असल्याच्या बातम्या आहेत. बाय द वे, तुम्ही दोघे लग्नासाठी किती उत्सुक आहात? कमेंट करून सांगा.