कतरिना कैफची जुळी बहीण आहे की काय? Photo पाहून चाहते गोंधळले

Katrina Kaif Looklike Alina Rai: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे कतरिना कैफची. परंतु त्यातूनही चर्चेत आहे ती म्हणजे तीची डुप्लिकेट अलिना राय. अलिना ही इन्टाग्रामवरही (Katrina Kaif) चांगलीच लोकप्रिय आहे. तिचेही अनेक चाहते आहेत. कतरिना कैफच्या या डुप्लिकेटची (Katrina Kaif News) सध्या सगळीकडेच चर्चा रंगलेली दिसते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 23, 2023, 12:33 PM IST
कतरिना कैफची जुळी बहीण आहे की काय? Photo पाहून चाहते गोंधळले title=
(Photo: Alina Rai | Instagram)

Katrina Kaif Looklike Alina Rai: बॉलिवूड हे असं विश्व आहे जिथे प्रसिद्धी, पैसा अन् ग्लॅमर पासून कोणच दूर राहत नाही. सलमानपासून शाहरूख पर्यंत आणि माधूरीपासून कतरिनापर्यंत या बड्या हिरो-हिरोईन्सचे जगभर कोट्यवधी चाहते आहेत. त्यांचे सोशल मीडियावरही असंख्य फॉलोवर्स आहेत. या मोठ्या आणि लोकप्रिय अभिनेते-अभिनेत्रींची नक्कल (Bollywood Celebrity Duplicates) करणंही सध्या विरंगुळा नाही तर सिरियस बिझनेस बनला आहे की काय असे जाणवते. हल्ली असे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची डूप्लिकेट सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. हे कलाकार सध्या सगळीकडेच लोकप्रिय आहेत. त्यांचेही असंख्य फॉलोवर्स आहेत.

आपली वेगळी कलाही ते लोकांपर्यंत मांडायचा पर्यंत करताना दिसत आहेत. सध्या कतरिना कैफच्या डुप्लिकेट कलाकराची चर्चा रंगली आहे. अलिना राय असं या अभिनेत्रीचे नाव आहे. ती बॉलिवूडमध्येही सक्रिय आहेत. नुकताच तिचा रोश हा चित्रपट 12 मे रोजी प्रसिद्ध झाला आहे. यावेळी तिनं ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती (Alina Rai Films) यांच्या मुलासह स्क्रिन शेअर केली होती. अलिना ही सेम टू सेम कतरिना कैफसारखी दिसते आहे. त्यामुळे इंटरनेटवर तिचीच चर्चा रंगलेली दिसते. ते डोळे, तेच ओठ, तेच नाक, तोच चेहरा; कतरिना कैफसारख्याच दिसणाऱ्या या अभिनेत्रीकडे पाहून 'अरे ही आहे तरी कोण?' असे प्रश्न चाहत्यांकडून उत्सुकतेने विचारले जाताना दिसत आहेत. 

हेही वाचा - अनुराग कश्यपला मुलीच्या लग्नाची चिंता... म्हणाला, ''तिच्या लग्नासाठी मला...'

अलिना रायनं अनेक म्युझिक व्हिडीओजमध्येही (Alina Rai Music Videos) काम केलं आहे. तिचे अनेक म्युझिक व्हिडीओही लोकप्रिय आहेत. सध्या तिची बरीच चर्चा रंगलेली दिसते आहे. अलिनाचं तुम्ही इन्टाग्राम अकांऊट पाहिलेत तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ती अगदी हुबेहुब कतरिना कैफसारखी दिसते आहे. अनेकांनी तिला तर कतरिनाची जुळी बहिण आहे की काय असंच वाटेल परंतु ती कतरिनाची जुळी बहीण नाही. तर अलिना ही एक स्वतंत्र अभिनेत्री आणि मॉडेल आहे. इन्टाग्रामवरही तिचे असंख्य फॉलोवर्स आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ती स्वत:ला कतरिनासारखी मी दिसत नाही असंही म्हणते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री कतरिना कैफ ही (Katrina Kaif Pregnancy) अनेकदा चर्चेत असते. ती तिच्या फॅशन आणि लुक्ससाठी प्रसिद्ध आहेच परंतु अनेकदा ती ट्रोलही होताना दिसते. त्यातून सध्या तिच्या प्रेग्नंन्सीच्याही चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. परंतु याविषयी कसलीही पुष्टी नाही. कतरिना लवकरच आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासह 'जी ले जारा' (Katrina Kaif Upcoming Movie) या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटाची सर्वत्र उत्सुकता लागून राहिली आहे.