KBC 16 Amitabh Bachchan : ‘कौन बनेगा करोडपति’ च्या इतिहासात जे कधी घडलं नाही ते आता बिग बींनी एका स्पर्धकासाठी केलं. 30 वर्षांच्या त्रिशूल सिंग चौधरी यांच्यासाठी अमिताभ यांनी थेट खेळाचे नियम बदलले. त्रिशूल बोकारो हे झारखंडमधील आहेत. ते एक सॉफ्टवेअर इंजीनियर आहेत. त्यांचा प्रवास आणि दृढता आणि त्यांच्या एकनिष्ठेचे प्रमाण आहे. त्यांनी कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याला पाहता त्यांच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या अडचणींवर मात केली आहे.
त्रिशुलनं हॉट सीटवर येताच हे सांगितलं की त्याच्यात खूप आत्मविश्वास असला तरी देखील त्याच्या त्याच्या परिस्थितीमुळे अनिश्चिती वाटते की या गेममधील काही सेगमेंट्स ते कशा प्रकारे पार करतील. हे ऐकून अमिताभ बच्चन यांनी त्रिशूल यांना मिठी मारली आणि या खेळातील काही नियम बदलण्याचा निर्णय घेतला.
16 सप्टेंबर रोजी बिग बीसोबत बोलत असताना त्रिशूल यांनी हे देखील विचारलं की ते कधी बीन बॅगवर बसलेत. त्रिशूल यांच्या प्रश्नला उत्तर देत अमिताभ बच्चन हसले आणि म्हणाले की बीन बॅग ही खूप वयाच्या लोकांसाठी नसते. त्यात कितीही आराम वाटत असला तरी त्या खूप वय झाल्यानंतर वापरू शकत नाही. त्रिशुल हसत म्हणाले पण तुम्ही तर फक्त 40-45 वर्षांचे आहात. हे ऐकून अमिताभ यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातवंडांसोबत घालवलेला वेळाविषयी सांगितलं. त्यांनी यावेळी सांगितलं की कशा प्रकारे ते सगळे त्यांना हॉलिवूडचा साय-फाय चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेले.
अमिताभ यांनी सांगितलं की त्यांना अशा धाटणीचे चित्रपट समजून घेण्यास फार त्रास होतो. मात्र, त्यांच्या नातवंडांनी या चित्रपटाचा आनंद घेतला. पण अमिताभ यांना वाटतं की त्यांना चांगल्या पद्धतीनं समजलं नाही आणि त्यांच्या नातवंडांनी मस्करीत म्हटलं की 'आम्हाला कल्किपण नाही कळला.' त्यानंतर त्रिशुल यांनी 'कल्कि 2899 एडी' आणि अमिताभ बच्चन यांच्या अश्वत्थामाच्या भूमिकेविषयी सांगत त्याची स्तुती केली.