मुंबई : छोट्या पडद्यावरील आणखी एक लोकप्रिय जोडी घटस्फोट घेत आहे.
नुकतंच किरण करमरकर आणि रिंकू करमरकरच्या घटस्फोटाची बातमी सगळ्यांना धक्का देऊन गेली. आता अशीच एक क्यूट कपल वेगळं होतं आहे. या दोघांनी आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये एक जोडी म्हणून स्वतःला रिप्रेझेंट करत होते.
त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. पण आता ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. हे दोघे आहेत. जुही परमार आणि सचिन श्रॉफ. अनेक दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होत होती. पण आता या दोघांनी वांद्रे कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केला आहे. परस्परांच्या सहमतीने हे दोघे घटस्फोट घेत आहेत.
जुही आणि सचिन यांना चार वर्षांची समायरा ही मुलगी असून ती सध्या जुहीसोबत राहाते. तिची कस्टडी जुहीकडेच राहाणार असल्याची चर्चा आहे. जुही परमारला प्रेक्षक कुमकुम म्हणूनच ओळखतात. कुमकुम प्यारा सा बंधन या मालिकेत तिने साकारलेली कुमकुमची भूमिका चांगलीच गाजली होती. तसेच काही वर्षांपूर्वी ती बिग बॉसमध्य झळकली असून विजेतेपद देखील तिने मिळवले होते.
२००९ मध्ये तिने सचिन श्रॉफ सोबत लग्न केले होते. सचिन हा व्यवसायिक असण्यासोबतच छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता देखील आहे. त्याने सिंदूर तेरे नाम का, नागिन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सचिन आणि जुहीच्या लग्नाला आठ वर्षं झाले असून आता ते दोघे घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार ते दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहात आहेत. जुही आणि सचिनच्या लग्नानंतर सगळे काही सुरळीत सुरू होते. सुरुवातीच्या काळात त्या दोघांचे एकमेकांवर खूपच प्रेम होते. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे.