मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. दुसऱ्या दिवशीच चित्रपटाचे अनेक स्क्रिन्स रद्द झाल्याचीही माहिती समोर आली होती तर काही ठिकाणी शोला प्रेक्षकांची गर्दी नसल्याचे दिसले. यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.
अकादमीनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये द फॉरेस्ट गम्प आणि लाल सिंग चड्ढाचे काही क्लिप्स दाखवण्यात आले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत 'द फॉरेस्ट गम्प आणि लाल सिंग चड्ढा रॉबर्ट गेमेकिस आणि एरिक रॉथ त्या माणसाच्या कथेनं जग बदललं. या चित्रपटाचं भारतीय व्हर्जन अतुल कुलकर्णी आणि अद्वैत चंदन यांनी आणत लाल सिंग चड्ढा हा चित्रपट बनवला. टॉम हँकसनं साकारलेली भूमिका आमिर खाननं साकारली आहे', असे कॅप्शन दिले.
दरम्यान, 'फॉरेस्ट गम्प' या हॉलिवूड चित्रपटाला 13 पैकी 6 ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.. हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. अशा परिस्थितीत आमिरचा हा चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीत जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे. आमिरच्या चित्रपटाने देशात चांगली कामगिरी केली नसली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट चर्चेत आहे.
'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) मुख्य भूमिकत दिसली. तर मोना सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य देखील दिसला. दरम्यान, या चित्रपटाचा विरोध केला जात आहे. तर अनेक सेलिब्रिटी आमिरच्या सपोर्टमध्ये पुढे आले आहेत.