सुष्मिताला डेटिंग करण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ललित मोदीनं सुनावलं, पाहा काय म्हणाले....

सुष्मिता सोबतच्या नात्यावरील ट्रोलिंगवर ललित मोदी संतापले,डेटिंग...फरार...मीडिया...ट्रोलर्सना प्रत्युत्तर

Updated: Jul 17, 2022, 04:37 PM IST
सुष्मिताला डेटिंग करण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ललित मोदीनं सुनावलं, पाहा काय म्हणाले.... title=

मुंबई : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. ललित मोदींनी फोटो ट्विट केल्यानंतर डेट करत असल्याची माहिती दिली होती. या ट्विटनंतर आता सोशल मीडियावर त्या दोघांच्या नात्यांची चर्चा सुरु झालीय, त्यांना ट्रोल केलं जातंय, अशा घटना घडतायत. या ट्रोलिंगवर आता ललित मोदींनी नवीन ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ट्रोलर्सना सुनावले आहे.   
 
सुष्मिता सेनसोबतच्या नात्यावरील बातम्यांनी व सोशल मीडियावर सुरु असलेल्या ट्रोलिंगवर ललित मोदी चांगलेच संतापले आहेत. ललित मोदी यांनी ट्विट करत एकूण एक आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ट्रोलर्सना, मीडियाला आणि टीकाकारांना त्यांनी सुनावले आहे. 

ट्रोलर्सना सुनावले
मीडियाला मला ट्रोल करण्याचे इतके वेड का आहे? मी इंस्टा वर फक्त 2 चित्रे पोस्ट केली, हे कोणी समजावून सांगू शकेल का? मला वाटते की आपण अजूनही मध्ययुगीन युगात जगत आहोत. दोन लोक मित्र होऊ शकत नाहीत आणि जर केमिस्ट्री योग्य असेल आणि वेळ चांगली असेल तर आपण चांगले मित्र का होऊ शकत नाही.

माध्यमांवर बरसले
ललित मोदी म्हणाले, 'माध्यमांना मला ट्रोल करण्याचे वेड का आहे? माझ्या मते आपल्या देशात जबाबदार पत्रकार नाहीयेत. याप्रकरणी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. प्रत्येक पत्रकार अर्णब गोस्वामी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. माझा सल्ला आहे की तुम्ही स्वतः जगा आणि इतरांना जगू द्या. योग्य बातमी लिहा. डोनाल्ड ट्रम्प स्टाईलमध्ये फेक न्यूज नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

मीनल मोदीवर काय म्हणाले?
'तुम्हाला माझ्याबद्दल माहिती नसेल तर मी तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल सांगेन. माझ प्रेम मीनल मोदी आता या जगात नाहीत. विवाहित असूनही ती 12 वर्षे माझी चांगली मैत्रीण होती. ती माझ्या आईची मैत्रिण नव्हती.या गोष्टी केवळ स्वार्थासाठी पसरवल्या गेल्या. या आजारी मानसिकतेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. मला आशा आहे की तुम्हाला याचा अर्थ काय माहित आहे. जर कोणी पुढे जाऊन स्वतःचे आणि देशाचे भले करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्या, असा सल्ला देखील त्याने दिला आहे.  

फरार म्हणण बंद करा
मीडियाने फरार म्हणण बंद करण्याची विनंती ललित मोदी यांनी केली आहे. मी फरार नाहीए. न्यायालयाने मला दोषी ठरवलेले नाही. ललित मोदी म्हणाले की, जेव्हा ते बीसीसीआयमध्ये पदाधिकारी झाले तेव्हा त्यांच्याकडे फक्त 40 कोटी रुपये होते, जे 2013 मध्ये वाढून 47,680 कोटी रुपये झाले. ते पुढे म्हणाले की, आता तुम्हाला जागं होण्याची वेळ आलीय, जेव्हा मी बीसीसीआयमध्ये सामील झालो तेव्हा बँकेत फक्त 40 कोटी रुपये होते. मी 29 नोव्हेंबर 2005 रोजी माझ्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. माझ्यावर बंदी घातली तेव्हा बँकेत काय होते याचा अंदाज लावा 47,680 करोड़? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.