मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार अर्जुन कपूरला त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या लव्ह लाईफसाठी विशेष ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून तो अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोराला डेट करत आहे, इतकेच नाही तर हे दोन्ही कलाकार अनेकदा पार्ट्यांना एकत्र दिसले आहेत. अलीकडेच, मालदीव व्हेकेशन दरम्यान दोघांनी फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. यावेळी दोन्ही कलाकार एकत्र एन्जॉय करताना दिसले.
त्याचबरोबर अभिनेत्री मलायका अरोरा हिने सलमान खानचा मोठा भाऊ अरबाज खान याच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या मुलाचे संगोपन केले आणि आज तिचा मुलगाही 19 वर्षांचा झाला आहे, सध्या तिचा मुलगा परदेशात राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहे.
मलायका बऱ्याचदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच अर्जुन कपूरसोबत ती सतत एन्जॉय करताना दिसते. वय हे केवळ मलायकासाठी आकडे आहेत. ती तिच्या ग्लॅमरस अंदाजाने आजही सगळ्यांचं लक्षवेधून घेताना दिसते.
आजही पाहिलं तर अभिनेत्रींची स्पर्धा सर्वात सुंदर अभिनेत्रींशी आहे, आता या दोन्ही कलाकारांच्या लग्नाबाबत अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. पण दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बऱ्याच दिवसांपासून दोघांमध्ये दूरावा आल्याचं ही बोललं जात होतं.
मलायका आणि अरबाजने 19 वर्षानंतर आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्री अर्जुन कपूरला डेट करत आहे. पण दोघांमध्ये सध्या दूरावा आल्याची जोरदार चर्चा होत आहे.
त्यामुळे अरबाजनंतर अर्जुन देखील मलायकाची साथ सोडणार का अशी चर्चा रंगते आहे. तो देखील मलायकाच्या वाट्याला दु:खचं देणार का असं देखील बोललं जात आहे. सोबत अर्जुन किंवा मलायका लग्नाबाबत कोणतचं वक्तव्य करत नसल्याने त्यांचा लग्नाचा प्लॅन देखील नसल्याचं बोललं जात आहे. या जोडीची सध्या इंडस्टीत सतत चर्चा होते आहे.