मुंबई : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार कपलपैकी एक आहेत. दोघंही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे चाहते या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही कपल्स अनेकदा एकत्र स्पॉट होतात. हे कपल सोशल मीडियावर कपल्स गोल करताना दिसत आहे. दरम्यान, अलीकडेच मलायकाने तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला त्याच्या वाढदिवसाच्या 3 दिवस आधी एक खास भेट दिली आहे.
मलायकाने अर्जुनला त्याच्या वाढदिवसाआधी दिले गिफ्ट
खरं तर, 26 जूनला अर्जुनचा वाढदिवस आहे आणि गर्लफ्रेंड मलायका अरोराला त्याला स्पेशल फील करायचं आहे. ज्यासाठी तिने वाढदिवसाची तयारी सुरू केली आहे. अर्जुनच्या वाढदिवसाआधीच मलायकाने त्याच्यासाठी एक नाही तर अनेक भेटवस्तू पाठवल्या आहेत. याची माहिती स्वतः अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. गुरुवारी अर्जुन कपूरने मलायकाने दिलेल्या भेटवस्तूची एक झलक त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.
गिफ्ट्सचा फोटो शेअर करत अभिनेत्याने एक गोड नोट लिहिली आहे. अर्जुनने लिहिलं की, 72 तास आधी ती तुम्हाला आठवण करून देते की, हा तुझा बर्थडे वीकेंड आहे. मलायकाने अर्जुनला पाठवलेले गिफ्ट ब्लॅक अँड व्हाईट कलरच्या गिफ्ट रॅपमध्ये पॅक केलेलं आहे.
मलायका अरोरासोबत अर्जुन कपूर क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी आणि पॅरिस या सुंदर ठिकाणांपैकी एक रोमँटिक व्हेकेशन साजरं करण्यासाठी रवाना झाला आहे. दोघंही नुकतेच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.