...तर 'हीरामंडी' मध्ये मल्लिका जानच्या भूमिकेत दिसल्या असत्या रेखा, पण असं का होऊ शकलं नाही?

Heeramandi : तर हीरामंडीमध्ये  मल्लिका जानच्या भूमिकेत मनीषा कोयराला नाही तर दिसल्या असत्या रेखा... मनीषा कोयरालानंच केला खुलासा

दिक्षा पाटील | Updated: May 6, 2024, 12:30 PM IST
...तर 'हीरामंडी' मध्ये मल्लिका जानच्या भूमिकेत दिसल्या असत्या रेखा, पण असं का होऊ शकलं नाही? title=
(Photo Credit : Social Media)

Heeramandi : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरिजनं सगळ्यांची मने जिंकली. या सीरिजमध्ये अभिनय करणाऱ्या मनीषा कोयरालाची सगळीकडे स्तुती सुरु आहे. या सीरिजमध्ये मल्लिका जान ही भूमिका मनीषा कोयरालानं साकारली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की ही भूमिका सगळ्यात आधी रेखा यांना ऑफर करण्यात आली होती. याचा खुलासा स्वत: मनीषा कोयरालानं केला आहे. 

खरंतर, 'फिल्मीज्ञान' ला दिलेल्या मुलाखतीत मनीषाला तिच्या भूमिकेविषयी विचारण्यात आलं तर त्याविषयी बोलताना म्हणाली, रेखाजी यांना 18-20 वर्षांपूर्वी ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. दरम्यान, रेखा यांची स्तुती करत मनीषा म्हणाली की जेव्हा त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीला त्यांनी पाहिलं. त्यानंतर लगेच त्यांनी मला फोन केला आणि आनंद व्यक्त करत म्हणाल्या की त्या आशा करत होत्या की त्यांच्यासारखंच कोणी तरी ही भूमिका साकारु शकेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मनीषानं पुढे सांगितलं की रेखा यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीकडून आशीर्वाद मिळणं, तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ती भावूक झाली आणि रेखा यांनी जे काही सांगितलं ते ऐकून त्यांचे आभार मानले. मनीषानं रेखा यांनी देवी म्हटलं आणि त्यांचं काम, कविता आणि सुंदरतेची स्तुती केली. मनीषा कोयरालाशिवाय या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सहगल, ताहा शाह, फरीदा जलाल, शेखर सुमन, फरीदा खान, अध्ययन सुमनसोबत इतक काही कलाकार देखील आहेत. लाहोरच्या हीरामंडीवर असलेल्या या वेब सीरिजची प्रचंड स्तुती होत आहे. तर दुसरीकडे काही लोक त्यांच्या चूका दाखवत आहेत. 

हेही वाचा : '25 वर्षांपासून इंडस्ट्री...', कॉमेडी शोमध्ये खिल्ली उडवण्यामुळं करण जोहर नाराज

संजय लीला भन्साळी यांच्या या वेब सीरिजला बनण्यासाठी 14 वर्ष लागले. रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जात आहे की त्यांना या विषयावर काम करण्याचा सल्ला 14 वर्षांपूर्वी मोईन बेगनं दिली होती. तेव्हा संजय लीला भन्साळी ही 'देवदास'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्यानंतर ते देखील ते सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाले. त्यामुळे या सीरिजचं काम हे अडून राहिलं होतं. त्यामुळे मोईन बेन यांनी त्यांना हीरामंडीची स्क्रिप्ट परत करण्यास सांगितलं. पण संजय लीला भन्साळी यांनी याविषयावर वेबसीरिज करण्याचा निर्णय घेतला,