मुंबई : 'मिशन मंगल','बाटला हाऊस' एकाच दिवशी चित्रपटगृहात धडकल्यामुळे कोणाता चित्रपट बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. चित्रपटांच्या या काटे की टक्करमध्ये अभिनेता अक्षय कुमारचं मिशन यशस्वी ठरल्याचं दिसत आहे. १५ ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल झालेल्या 'मिशन मंगल'ने काही दिवसांतच विक्रमी कामाई केली. ३२ करोडच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या चित्रपटाने १८७ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला.
#MissionMangal is now #AkshayKumar’s highest grossing film in #Australia... Total till 1 Sept 2019: A 601,561 [₹2.91 cr; still running]... Has crossed *lifetime biz* of #Housefull series, #Kesari, #PadMan and all #Akshay starrers in #Australia. @comScore
— taran adarsh (@taran_adarsh) September 2, 2019
अक्षयचा मिशन परदेशात देखील उत्तम रित्या पार पडला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे चित्रपटाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये चित्रपटाने २ कोटी ९१ लाखांचा गल्ला जमा करत एक अनोखा रेकोर्ड आपल्या नावावर केला आहे.
मिशन मंगल चित्रपटाचं दिग्दर्शन जगन शक्ति यांनी केलंय. अक्षय कुमारसह चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, शर्मन जोशी, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हारी, नित्या मेनन, संजय कपूर आणि जीशान अयूब यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
चित्रपटात अक्षय संशोधक राकेश धवन या मिशनच्या प्रमुखाची भूमिका साकारत आहे. इतिहासच्या पानांत सुवर्णाक्षरात नोंद झालेल्या देशाचा प्रेरणादायी अंतराळ प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.