मौनी रॉयला रिवीलिंग ब्लाउज घालणं पडलं महागात; कॅमेरासमोरच घडला असा प्रकार

मौनी रॉय तिच्या लूकने आणि स्टाइलने सर्वांना वेड लावते. 

Updated: Jun 24, 2022, 09:47 PM IST
मौनी रॉयला रिवीलिंग ब्लाउज घालणं पडलं महागात; कॅमेरासमोरच घडला असा प्रकार title=

मुंबई : मौनी रॉय तिच्या लूकने आणि स्टाइलने सर्वांना वेड लावते. यावेळीही असंच काहीसं घडलं जेव्हा ही अभिनेत्री रिअॅलिटी शोच्या सेटबाहेर दिसली. यावेळी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. त्यानंतर अभिनेत्रीच्या हे लक्षात आलं आणि तिने पापाराझींसमोर दुपट्ट्याने स्वतःला झाकण्यास सुरुवात केली.

लेहेंग्यासह परिधान केला रिविलींग ब्लाउज
या व्हिडीओमध्ये मौनी रॉयने लेहेंगा चोली घातली आहे.  या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्रीने रिवीलिंग ब्लाऊज घातला आहे. जो खूप डिपनेक आहे. हे मौनीच्या लक्षीत येताच अभिनेत्री समोरून चोळीने स्व:ताला झाकू लागते.

मौनी रॉयने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मरून आणि सिल्व्हर कॉम्बिनेशन कानातले घातले आहेत. यासोबतच ती हलका मेकअप करून मोकळ्या केसांमध्ये दिसली. अभिनेत्रीचा हा लूक ज्यांनी कोणी पाहिला त्यांना पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याची खात्री पटली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

असा प्रश्न पापाराझींनी विचारला
मौनी रॉयला पाहताच पापाराझींनी तिच्या 'ब्रह्मास्त्र' लूकचं कौतुक करण्यास सुरुवात केली. तेव्हा अभिनेत्रीने पापाराझींना विचारलं की, तुम्हाला माझा लूक कसा वाटला. पापाराझींनीही मौनीच्या लूकचं भरभरुन कौतुक केलं.