मुंबई : 'छपाक' सिनेमाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी #MuhDikhai2.0 नावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ऍसिड हल्यातून बचावलेल्या मुलींचा देखील समावेश आहे. मेघना गुलजार यांनी सिनेमात या मुलींना दीपिका पदुकोणसोबत घेतलं आहे.
एका बाजूला आपण महिलांच्या सुरक्षितेतासाठी भांडतो तर दुसऱ्या बाजूला आपल्याला महिलांची सुंदरता अधिक महत्वाची असते. या महत्वाच्या मुद्यावर मेघना गुलजारने या व्हिडिओतून भाष्य केलं आहे. 'छपाक' सिनेमात 4 ऍसिड हल्यातून बचावेल्या मुलींचा देखील समावेश आहे.
या मुली अनेकवर्ष आपला चेहरा झाकून समाजात वावरत होत्या. त्यांचा चेहरा त्यांनी जगासमोर कधीच आणला नव्हता. लक्ष्मी यावर सांगते की, 'जेव्हा मी माझा चेहरा ओढणीतून बाहेर काढला तेव्हाच खऱ्या अर्थाने माझ्या जगण्याला सुरूवात झाली होती.'
ऍसिड हल्ला झालेल्या मुलींना देखील समाजात इतर मुलींप्रमाणे वागणूक मिळालया हवी. त्यांच्याकडे देखील सहज पाहिलं जायला हवं, असं दीपिका सांगते. #MuhDikhai2.0 म्हणजे सुंदर चेहरा नाही तर सुंदर मन असल्याचं या व्हि़डिओतून सांगण्यात आलं आहे.