कसा आहे नाना पाटेकरांचा 'ओले आले' सिनेमा; वाचा सिनेमाचा Review

नुकताच 'ओले आले' (Ole Aale) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना  चांगलीच भुरळ घातली आहे.  नाना पाटेकर, सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि सिद्धार्थ चांदेकर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हृदयाला भिडणारा असा हा सिनेमा आहे. 

सायली कौलगेकर | Updated: Jan 8, 2024, 12:38 PM IST
कसा आहे नाना पाटेकरांचा 'ओले आले' सिनेमा; वाचा सिनेमाचा Review

मुंबई : नुकताच 'ओले आले' (Ole Aale) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना  चांगलीच भुरळ घातली आहे.  नाना पाटेकर, सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि सिद्धार्थ चांदेकर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हृदयाला भिडणारा असा हा सिनेमा आहे. वडिल आणि मुलाचं नातं या सिनेमाद्वारे सुंदररित्या मांडलं आहे. या सिनेमात  नानांनी ओमकार लेले (सिद्धार्थच्या वडिलांची)  तर सिद्धार्थ चांदेकरने  आदित्य लेले (नानांच्या मुलाची) भूमिका साकारली आहे.  

कसा आहे सिनेमा
या सिनेमात आदित्य लेले खूप मोठा बिझनेसमन असतो. तो स्वत:ला इतकं बिझी ठेवतो की आजू-बाजूचं जगच विसरतो. त्यानंतर ओमकार लेले त्याला त्या जगातून बाहेर काढण्यासाठी आणि स्वत:ला आणि त्याच्या वडिलांना वेळ देण्यासाठी खूप प्रयत्न करतात. पण त्या सगळ्या दरम्यान अशी एक गोष्ट घडते की, आदित्य लेले आणि ओमकार लेले यांना खूप मोठा धक्का असतो. पण त्यासगळ्यातून सावरण्यासाठीओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप - लेकाची जोडी  अनोख्या भारतभ्रमंतीवर निघतात. आणि मग सहलीत त्यांना सायली संजीव (काहीही) भेटते. या दरम्यान खूप धमाल मस्ती तर अनेक भावनिक क्षणही पहायला मिळतात.

या सिनेमातील जमेची बाजू म्हणजे नानांचा अभिनय. नानांनी त्यांची भूमिका उचलून धरली आहे. त्यांचा अभिनय पाहता हसून हसून लोटपोट होता होता तुमच्या डोळ्यात कधी पाणी येईल हे सांगता येत नाही. या सिनेमातील डायलॉग्स या सिनेमाची जमेची बाजू आहे. प्रत्येक डायलॉग मनाला भिडणारा आहे. तर या सिनेमातील गाणीही खूप उत्कृष्ट आहेत. सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकरच्या अभिनयालाही तोड नाही. एकंदरीत बाप लेकाची गोष्ट खूपच उत्कृष्ट प्रकारे मांडली आहे. तर पुन्हा एकदा मकरंद अनासपुरे यांनी खूप खळखळून हसवलं आहे. नाना आणि मकरंद यांची ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी यशस्वी झाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या गोष्टी अजून छान होवू शकल्या असत्या
चोपटा, ऋषिकेश,  केदारनाथ सिनेमातील लोकेशन तर खूपच सुंदर आहे. लोकेशन अजून छान प्रकारे एक्सप्लोर करता येूव शकलं असतं. तर मकरंद अनासपुरे यांची भूमिका फार कमी आहे त्यांनाही अजून पाहायला आवडलं असतं. मात्र नवीन वर्षाची सुरुवात बाप लेकाच्या या सुंदर बॉन्डिंगने झाल्याने हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरेल यात काहीच शंका नाही. त्यामुळे आम्ही या सिनेमाला देतोय 4 स्टार