मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियाने यंदा 2018 मध्ये मे महिन्यात लग्न केलं. अभिनेता अंगद बेदीसोबत नेहा धूपियाने अगदी अचानक लग्न केलं. लग्नाची कुणालाही कानोकान खबर न देता नेहाने अंगदशी लग्न केलं. नेहाने आपल्या या लग्नाबाबत पहिल्यांदा एका मुलाखतीत माहिती दिली आणि सर्वात मोठा खुलासा दिला.
नेहा यांनी सांगितलं की, जेव्हा मी इंस्टाग्रामवर माझ्या लग्नाचे फोटो शेअर केले. त्यानंतर मी फोन चेक केला तेव्हा पाहिलं की तब्बल 600 मॅसेज मला आले होते. तेव्हा मला फॅन्स चाहते देण्याएवजी शिव्या घालत होते. वाईट साईट बोलत होते. नेहाने पुढे सांगितलं की, अंगद याबाबतीत सुरूवातीपासूनच क्लिअर होते. तुझ्यासोबत मी गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंडच्या नात्यात नाही राहू शकत मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आणि लग्न सिक्रेट ठेवायचं हा आमच्या दोघांचा निर्णय होता. यामुळे आम्ही हे लग्न गुपित ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता.
नेहा सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 'ईला' हा तिचा आगामी सिनेमा आहे. नेहा यामध्ये काजोलची को - स्टार आहे.