मुंबई : तमिळ अभिनेत्री निवेथा पेथुराजसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना तिने तिच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली आहे. निवेथाने 23 जून रोजी स्विगीच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिली होती, मात्र ती हे जेवण जेवुच शकली नाही. आता यामागचं कारण ऐकुन तुम्हालाही धक्का बसेल.. जाणून घ्या हा संपुर्ण प्रकार
जेवणात सापडलं झुरळ
निवेथाने ऑनलाईन ऑर्डर केलेलं जेवणं ती जेवूच शकली नाही यामागे एक कारण आहे. तिच्या जेवणात एक नाही, तर दोन झुरळे सापडली. 23 जूनला रात्री निवेठा पेठूराजने 'मूनलाइट टेकवे' या नावाच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवलं. तिने मागवलेल्या राईसमध्ये एक नव्हे तर चक्क दोन झुरळं बाहेर आली. या जेवणाचे फोटोही निवेथाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जेवणातील झुरळ स्पष्ट दिसत आहे. यामुळे निवेठा अस्वस्थ झाली आणि तिने आपला संपूर्ण अनुभव सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला.
अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये निवेठा पेठूराजने लिहिलंय की, 'सध्या स्विगी आणि रेस्टॉरंट्स कोणत्या मानकांची देखभाल करतात याची मला कल्पना नाही. माझ्या जेवणातून दोनदा झुरळे बाहेर आलं आहे. या रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी केली जाणं खूप महत्वाचे आहे. जर ते निकषांनुसार नाहीत तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
पूर्वीही असाच लोकांचा अनुभव होता
निवेथाच्या या पोस्टवर चाहत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. त्यात इतर बर्याच लोकांनीही आपले अनुभव निवेथाबरोबर शेअर केले. निवेता पेठूराजने यानंतर आणखी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये निवेथाने लिहिलं आहे की, 'मला असे अनेक मेसेजेस आले, ज्यात असं सांगण्यात आलं होतं की, हे पहिल्यांदाच घडत नाही, याआधीही या रेस्टॉरंटमधून असे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र यानंतरही, रेस्टॉरंट इतकं बेजबाबदार कसं वागू शकतं. याच बरोबर निवेथाने स्विगी अॅपला रेस्टॉरंट एपमधून काढण्याची तीने विनंती केली आहे.