नवी दिल्ली : देशभरातून होत असलेल्या विरोधानंतरही पद्मावत सिनेमा रिलीज झाला. समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत करणी सेनेने या सिनेमाला कडवा विरोध जाहीर केला होता.
पण सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसातच हा विरोधा मावळला. करणी सेनेने आपला विरोध मागे घेतला.
या सर्वाचा फायदा अर्थात सिनेमाच्या गल्ल्यावर झाला.
सुरुवातीपासून पद्मावतला राजपूत करणी सेनेचा जबरदस्त विरोध होता. सुरूवातीला राजस्थानात असलेला हा विरोध नंतर देशभर पसरला.
गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणात चित्रपटावर बंदी घालण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चित्रपट प्रदर्शित झाला.
ट्रेण्ड अॅनालिस्ट तरण आदर्शने या सिनेमाशी संबंधित काही गोष्टी ट्विटरवर शेअर केल्या आहेत.
'या' राज्यात पद्मावत सिनेमाला असलेला राजपूतांचा विरोध मागे
बुधवारी या सिनेमाचे पेड प्रीव्ह्यू स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. यातून सिनेमाची ५ कोटींची कमाई झाली. आता कुठे या सिनेमाला सुरूवात झाली आहे.
पहिल्या दिवशीच जर एवढी कमाई झाली तर येणार्या दिवसात सर्व रेकॉर्ड तुटतील याची अपेक्षा निर्मात्यांना आहे.
पद्मावत चित्रपटानंतर दीपिकाने निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत चित्रपटाची हॅट्रिक पूर्ण केली.
लीला, मस्तानी आणि पद्मिनी अशा महत्त्वपूर्ण आणि आठवणीत राहणाऱ्या भूमिका तिला मिळाल्या. दीपिकाच्या राणी पद्मिनीच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले.
मात्र दीपिकाच्या फॅन्सने एक अनोखे कॅपेन सुरू केले. चित्रपटाला विरोध होत असताना दीपिकाच्या फॅन्सने पद्मावत चित्रपटाच्या तिकीटासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
इतकंच नाही तर ट्विटरवर #DP1stDay1stShow हा हॅशटॅग भारतात टॉप ट्रेंडमध्ये आहेत.