Paresh Rawal News: सध्या रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट जोरात चालताना दिसतो आहे. रणबीर कपूरच्या अभिनयानं सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. यावेळी बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांकडून त्याच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसते आहे. परंतु यावेळी अभिनेते परेश रावल यांच्या व्यक्तव्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. बॉलिवूडवर अनेकदा घराणेशाहीचे आरोप लागतात. यावरून स्टार कीड्स आणि त्यांच्या अभिनयावरून त्यांच्यावर टीकास्त्रही उठावले जाते. बाहेरच्या कलाकारांना येथे फारशी जागा मिळत नाही. सोबतच स्टार कीड्सनाच फक्त संधी मिळते त्यामुळे इतरांना फारशी संधी मिळत नाही असा रोषही उठताना दिसतो.
यावरूनच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी केलेले विधान सध्या चर्चा आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी स्पष्टपणे उत्तर देत यावेळी रणबीर कपूरवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांचा मुलगा आदित्य रावल यानं नव्या चित्रपटातून डेब्यू केला आहे. आदित्य हा त्यांचा दुसरा मुलगा आहे. त्यानं नुकतंच 'बेमफाद' या चित्रपटातून डेब्यू केला आहे. त्याचसोबत नुकताच तो 'फर्राज' या हंसल मेहताच्या प्रोजेक्टमधून दिसला होता. यावर परेश रावल यांच्या मुलाच्या डेब्यूवर ते नक्की काय म्हणाले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. यावेळी ते म्हणाले की, माझी दोन्ही मुलं आपापली निवड हे स्वत: करताना दिसतात. जोपर्यंत ते चुका करत नाहीत. जोपर्यंत ते मला सल्ला विचारत नाहीत तोपर्यंत मी त्यांना काहीच सल्ला देत नाही.
यापुढे ते म्हणाले की, ''मला यो गोष्टीवर विश्वास आहे की ते जेवढ्या चुका करतील त्यातून ते नक्कीच शिकतील. पण मी हे सांगू इच्छितो की त्यांच्या प्रचंड टॅलेंट आहे आणि सोबतच ते प्रचंड मेहनतीही आहेत. त्यांनी या इंडस्ट्रीत येण्यासाठी आपल्या नावाचा वापर केलेला नाही.'' असे त्यांनी नमूद केले. यावेळी बॉलिवूडवर बोलताना त्यानं सांगितलं आहे.
यावेळी त्यांनी ब़ॉलिवूडच्या घराणेशाहीवरही आपले मत मांडले आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या चर्चांना बोगस असं म्हटलं आहे. यावेळी ते म्हणाले की, मला वाटतं की नेपोटिझम हे बोगस आहे. माझा मुलगा जर रणबीर कपूर किंवा आलिया भट्ट एवढा टॅलेंटेड असता तर मी माझ्याकडे असलेला सर्व पैसा त्यात टाकला असता. मला एक कळत नाही जेव्हा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो किंवा बार्बरचा मुलगा जेव्हा बार्बर होतो तेव्हा त्याला काय म्हणावं? मला नाही वाटतं यात काही चुकीचं आहे. नेपोटिझमवर बोलण्यापेक्षा तुम्ही त्यांना हे विचारा की त्यांना या क्षेत्रात का यावंसं वाटलं.