Prabhas Body Double Salary: तुम्ही बॉडी डबलबद्दल ऐकले आहे का? बॉडी डबल हे चित्रपटातील कलाकारांसाठी काम करतात. अनेकदा आपण मोठ्या स्क्रिनवर पाहत असतो तो खरा अभिनेता आहे की त्याचा बॉडी डबल? हे आपल्या लक्षात येत नाही. दरम्यान एक बॉडीडबल त्याच्या कमाईमुळे प्रसिद्ध झालाय. साऊथ हिरो प्रभासच्या बॉडीडबलची कमाई एखाद्या हिरोपेक्षाही जास्त आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सन 2015 मध्ये दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली: द बिगिनिंग'ला साऱ्या देशाने उचलून धरले. या सिनेमाची कथा,त्यातील पात्र या सर्वांचीच खूप चर्चा झाली. सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या प्रभाससाठी हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटाने त्यांना देशातच नव्हे तर जगभरात सुपरस्टार बनवले. या काळात प्रभासच्या बॉडी डबलचीदेखील खूप चर्चा झाली.
बाहुबलीच्या यशाने प्रभासचे करिअर पूर्णपणे बदलून टाकले. यानंतर प्रभास अनेक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये दिसला. प्रभासच्या आगामी 'कल्की 2898AD' चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामध्ये प्रभासचा बॉडी डबल म्हणून काम केलेल्या तरुणाची कमाई ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. प्रभासच्या लोकप्रियतेत सर्वात मोठा हातभार त्याच्या बॉडी डबलचा आहे. हा बॉडीडबल किती कमाई करत असेल? पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, प्रभासचा बॉडी डबल दररोज 30 लाख रुपये कमावतो.
प्रभासच्या प्रत्येक सिनेमात हा बॉडी डबल असतो. प्रभासच्या अॅक्शन चित्रपटात तर हा हमखास असतो. पण यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागते. प्रभाससारखे दिसणे, त्याच्यासारखी बॉडी, वजन राखणे हा त्याच्यासाठी मोठा टास्क असतो. एका मोठ्या चित्रपटासाठी तो 1 महिन्यापेक्षा जास्त काळ सेटवर राहतो. हे सर्व करुन त्याला प्रत्येक प्रोजेक्टमधून 9 ते 10 कोटी रुपयांची चांगली कमाई करता येते. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनने याबद्दल माहिती दिली आहे.
'सालार' आणि 'कल्की 2829' सारख्या चित्रपटांमध्ये आणि आगामी अॅक्शन सीन्समध्ये प्रभासशी बरोबरी करणाऱ्या बॉडी डबलची उंची आणि शरीरयष्टी त्याला विशेष बनवते. यामुळे त्याला भारतीय सिनेमातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉडी डबल्सपैकी एक मानले जाते. आहे. प्रभासचा आगामी चित्रपट 'कल्की 2898AD' 9 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय प्रभास 'राजासबाह' सिनेमातही दिसणार आहे. प्रभासने काही दिवसांपूर्वीच सोशल मिडिया अकाऊंटवरुन याचे पोस्टर शेअर केले होते.