Prajakta Mali : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या तिच्या 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं प्राजक्ता माळी हे चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. याच वेळी एका मुलाखतीत प्राजक्तानं शिक्षक दिनानिमित्तानं तिच्या शाळेतील एक किस्सा सांगितला आहे. यावेळी प्राजक्तानं खुलासा केला की की तिला शाळेत असताना पारो हे नावं देण्यात आलं होतं. त्याचं कारण काय याविषयी देखील प्राजक्तानं खुलासा केला आहे.
प्राजक्ता तिच्या शाळेतील किस्सा सांगत म्हणाली की 'मी नववीत असताना शाळेच्या गॅदरिंगमध्ये देवदासची पॅरडी केली होती. त्यात देवदासची सगळी गाणी आम्ही केली होती. त्या 10-11 मिनिटांच्या प्रकरणात मी तीन साड्या बदलल्या होत्या. या साड्या एकावर एक नेसल्या होत्या. विंगेत गेले की मी एक साडी काढायचे. मी पहिल्यांदाच शाळेच असताना अशी पॅरडी केली होती. इतकंच नाही तर मी डान्स करायचे तर मी ती कोरिओग्राफही केली होती.'
पुढे प्राजक्ता तिच्या पारो नावाविषयी बोलताना म्हणाली की 'त्या पूर्ण पॅरडीची मी च हीरोईन होते. त्यानंतरच पूर्ण शाळा मला पारो म्हणून हाक मारू लागले. मग सगळेच मी जर कधी कुठे जाताना दिसले की 'ए पारोSSS' अशी हाक मारायचे.' याविषयी पुढे प्राजक्ता म्हणाली की तिला या सगळ्या गोष्टी आवडायच्या तिला कधी राग आला आहे.
हेही वाचा : दिग्दर्शकानं ब्रा घालून येण्यास सांगताच...; माधुरीनं असं काही केलं की बिग बींना करावी लागली मध्यस्थी
प्राजक्ताच्या तीन अडकून सीताराम या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे दिसत असले तरी चित्रपटात आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन देखील हृषिकेश जोशी यांनी केलं आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळ्या जगात घेऊन जाणार आहे अशी आशा प्राजक्ताच्या चाहत्यांना आहे.