पुन्हा मोठा धक्का... लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रिटीला मातृशोक

बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या आईचं निधन.. कलाविश्वाला मोठा धक्का  

Updated: Apr 25, 2022, 10:25 AM IST
पुन्हा मोठा धक्का... लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रिटीला मातृशोक  title=

मुंबई :  बॉलिवूड विश्वाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे.  प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची आई सुषमा जोशी यांचं निधन झालं आहे. रविवारी 24 एप्रिल  रोजी प्रसून जोशी  यांच्या आईने जगाचा अखेरचा निरोप घेतला. सुषमा जोशी यांच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी आईचं निधन झाल्याची माहिती दिली. सुषमा जोशी यांच्यावर गुरुग्राममधील रामबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. 

प्रसूनच्या या दु:खात अनेक सेलिब्रिटींनीही त्याचे सांत्वन केलं. प्रसून जोशी यांनी देश आणि प्रेमावर आधारित अनेक कविता लिहिल्या आहेत, शिवाय त्यांनी आईवर देखील अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या कवितांनी अनेकांच्या आठवणी ताज्या केल्या. अनेक भावनात्मक कविता देखील त्यांनी लिहिल्या आहेत. 

प्रसून जोशी प्रसिद्ध गीतकार तर आहेतचं, पण त्यांच्यामध्ये एक कवी देखील लपलेला आहे. इतकंच नाही तर या कवितांना बॉलीवूड सिनेमांमध्ये त्यांनी गाण्याचं रूप दिलं. त्यांच्या गाण्यांनी देखील  लाखो-करोडो प्रेक्षकांना रडवलं.