प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलदेखील 'सैराट'मय : व्हिडिओ

आर्ची - परश्याचा लोकप्रिय डायलॉग

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलदेखील 'सैराट'मय : व्हिडिओ title=

मुंबई : 19 मे रोजी लंडनमध्ये प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या शाही विवाहसोहळ्याची जगभर चर्चा झाली. पण या सोहळ्याची आता पुन्हा एकदा चर्चा होतेय त्याला कारण आहे हा व्हिडिओ. आपल्याला माहितच आहे नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमा 2017 हे वर्ष अगदी गाजवलं. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर साता समुद्रापार याची चर्चा झाली. 

आता पुन्हा या सिनेमाची चर्चा रंगली आहे ते या शाही सोहळ्यामुळे. या शाही सोहळ्यातील एक खास क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी चक्क सैराट या सिनेमातील डायलॉग म्हटले आहेत. 

सैराट या सिनेमातील आर्ची आणि परश्याचा I Love You चा हा डायलॉग अतिशय लोकप्रिय झाला होता. आणि हाच डायलॉग प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भाडीपा म्हणजे भारतीय डिजिटल पार्टीने शेअर केला आहे.