नाटक पाहतानाच हृदयविकाराचा झटका; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन

आयुष्यभर अनेक नाटकांमध्ये काम केलं; पण नाटक पाहताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन   

Updated: Dec 16, 2022, 01:36 PM IST
नाटक पाहतानाच हृदयविकाराचा झटका; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन  title=

Rajabhau More passes away : आयुष्यभर अनेक नाटकांमध्ये काम केलं; पण नाटक पाहताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे (rajabhau more) यांचं निधन झालं आहे. राजाभाऊ मोरे यांचं निधन झाल्यामुळे रंगभूमी कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. राजाभाऊ मोरे आमरावती (amravati) येथील होते. अनेक नाटकांमध्ये राजाभाऊ मोरे यांनी मोलाचं योगदान दिलं, पण नाटक पाहतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि राजाभाऊ मोरे यांचं निधन झालं. (Rajabhau More passes away)

राजाभाऊ मोरे गुरुवारी  नाटक पाहण्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा  ‘थँक यु मिस्टर ग्लाड’ सुरु होतं. नाटक सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (marathi news)

पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच राजाभाऊ मोरे यांनी अखेरचा श्वास घेतला. एका ज्येष्ठ रंगकर्मीने नाटक पाहातानाच डोळे मिटल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. राजाभाऊ मोरे अनेक उभरत्या कलाकारांच्या प्रेरणास्थानी होते. म्हणून राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने अनेकांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (latest news marathi)

राजाभाऊ मोरे यांच्या निधनानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते ट्विट करत म्हणाले, 'राज्य नाट्य स्पर्धा हा त्यांचा श्वास होता. दीर्घकाळ त्यांनी राज्य नाट्य स्पर्धा गाजविली. या निष्ठावान रंगकर्मीच्या निधनाने नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.' 

 

'अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्री राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मीचा आधारवड हरपल्याचे दुःख आहे. रंगदेवतेचा वास असलेल्या नाट्यगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून दीर्घकाळ हौशी व प्रायोगिक' असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.