बापरे! 27 दिवसांपूर्वी मृत्यूविषयी वक्तव्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांना आज....

राजू श्रीवास्तव यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Updated: Aug 19, 2022, 02:58 PM IST
बापरे! 27 दिवसांपूर्वी मृत्यूविषयी वक्तव्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांना आज....  title=

मुंबई : जीवन- मृत्यूची झुंज देणाऱ्या विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी सध्या चाहते अविरत प्रार्थना करत आहेत. कुटुंबीय, चाहते, मित्रपरिवार प्रत्येकजण त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. गेल्या 9 दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, 'त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा नाही. डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांना ब्रेन डेड (Brain Dead) घोषित केलं आहे. त्यांच्या मुलीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. राजू केवळ शोमध्येच लोकांना हसवत होते असे नाही तर ते सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओही शेअर करत होते. हृदयविकाराचा झटका येण्याआधी काही दिवसांपूर्वी असाच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी यमराजचा उल्लेख केला होता. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. 

आणखी वाचा : '2 वेळा गर्भपात आणि...', काजोलचा धक्कादायक खुलासा

या व्हिडिओमध्ये राजू श्रीवास्तव (Raju Srivastav Video) आपल्या गजोधर शैलीत बोलत असताना सर्वप्रथम हात जोडून चाहत्यांना अभिवादन करत आहेत. त्यानंतर ते म्हणतात, 'कुछ नहीं, बस बैठे हैं। जिंदगी में ऐसा काम करो, कि अगर यमराज भी आएं, आपको लेने तो कहें, भाईसाहब भैसे पर आप बैठिए। नहीं नहीं, आप पैदल चल रहे हैं, अच्छा नहीं लग रहा है। आप भले आदमी हैं, नेक आदमी हैं, आप भैसे पर बैठिए, मैं पैदल चल लूंगा। ऐसे बनकर दिखाओ।' 

आणखी वाचा : ... आणि अबू सालेम जाळ्यात फसला; DGP रुपिन शर्मांनीच सांगितला 'त्या' प्रसंगाचा थरार

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ शेअर करत राजू श्रीवास्तव सांगत होते की चांगला माणूस बना. फसवणूक करू नका त्याने कोणाचा फायदा होत नाही. दरम्यान, राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, असे आवाहन करत आहेत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. राजूशी संबंधित अफवांमुळे कुटुंब अस्वस्थ होते. यामुळे त्यांनी लोकांना हे करू नये असे आवाहन केले आहे.