रामानंद सागर यांच्या पणतीचा बोल्ड लूक; नेटकरी म्हणतात यापेक्षा मच्छरदाणी परवडली

काही फोटो पोस्ट केले आहेत

Updated: Dec 29, 2021, 11:09 AM IST
रामानंद सागर यांच्या पणतीचा बोल्ड लूक; नेटकरी म्हणतात यापेक्षा मच्छरदाणी परवडली
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  दूरदर्शनवर लोकप्रिय मालिका रामायण सुरु झाली आणि सारा देश एकाच विषयाबाबत चर्चा करु लागला. अशी ही मालिका प्रेक्षकांपर्यंत आणणाऱ्या निर्माते रामानंद सागर यांच्या नावाची सध्या बरीच चर्चा होत आहे. चर्चा होण्याचं कारण मात्र काहीसं वेगळं आहे. 

रामानंद सागर यांच्या पणतीमुळं त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. 

आता तुम्ही म्हणाल पणती तिच्या पणजोबांच्या पावलावर पाऊल वगैरे ठेवतेय की काय?

तसं नाहीये. रामानंद सागर यांच्या पणतीनं हल्लीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. 

साक्षी चोप्रा असं तिचं नाव आहे. साक्षीनं सोशल मीडियावर नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये ती अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. 

एरव्हीही साक्षी बोल्ड रुपातच दिसते. पण, यावेळी मात्र तिनं निवडलेला ड्रेस सर्वांच्याच नजरा वळवत आहे. 

अतिशय जाळीदार, त्वचेच्याच रंगाचा ड्रेस साक्षीनं घातला आहे. बिकीनी आणि त्याला जोड देत जाळीदार पँट असा तिचा एकंदर लूक दिसत आहे. 

साक्षीनं पोस्ट केलेले हे फोटो आणि तिचा फॅशन सेन्स पाहता, अरे हिच्या ड्रेसपेक्षा मच्छरदाणी परवडली अशा कमेंट काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

साक्षीला काही दिवसांपूर्वीच अनेकांनी तिच्या या स्टाईलमुळं धारेवर धरलं होतं. तिची खिल्लीही उडवण्यात आली होती. 

मला नावं ठेवणाऱ्यांनी नावं ठेवा, काहीही करा मला यानं काहीच फरक पडत नाही अशा शब्दांत तिनं खिल्ली उडवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं.