Ranbir Kapoor On Alia: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट् दोन महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र दोन महिन्यानंतर रणबीरने काही खुलासे केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने आलिया भट्टसोबतच्या लग्नानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल सांगितले आहे.
"लग्नानंतर विशेष काही फरक पडलेला नाही. आम्ही पाच वर्षांपासून एकत्र होतो. आम्ही लग्न करू असा विचार केला आणि आम्ही केले. पण आमच्याही काही कमिटमेंट्स होत्या. लग्नानंतर आम्ही लगेचच आपापल्या कामाला निघालो.", असं रणबीर कपूरने मुलाखतीत सांगितलं.
"लग्नानंतर आलिया तिच्या शूटला गेली आणि मीही मनालीला गेलो. आता ती लंडनहून परत आली आहे आणि माझा 'शमशेरा' चित्रपट रिलीज होणार आहे, आम्ही एका आठवड्याची सुट्टी घेण्याचा विचार करत आहोत. आम्ही विवाहित आहोत हे अजूनही आम्हाला कळत नाही.", असंही रणबीर कपूरने पुढे सांगितले.
रणबीर आलियाचे चित्रपट
दोघांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, आलिया भट्ट चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तयार होत असलेल्या 'डार्लिंग्स' चित्रपटात दिसणार आहे आणि 'जी ले जरा'मध्ये ती कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत रोड ट्रिपला जाणार आहे.
रणबीर कपूरकडेही अनेक चित्रपट आहेत. अभिनेत्याने लग्नानंतर 'एनिमल'च्या शूटिंगला सुरुवात केली. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका दिसणार आहे. याशिवाय 'शमशेरा'मध्ये तो वाणी कपूरसोबत दिसणार आहे. तर 'लव रंजन' चित्रपटात तो श्रद्धा कपूरसोबत असणार आहे.