लग्नापूर्वी भट्ट कुटुंबियांची लेक होती 'या' अभिनेत्याच्या प्रेमात? आज दोघंही सिंगल

Ranvir Shorey: बॉलिवूडमध्ये चर्चा असते ती म्हणजे रिलेशनशिप्सची. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनत्याची. लग्न होण्यापुर्वी भट्ट कुटुंबियांची लेक या अभिनेत्याच्या प्रेमात होती, अशी चर्चा रंगली होती. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 18, 2023, 08:00 AM IST
लग्नापूर्वी भट्ट कुटुंबियांची लेक होती 'या' अभिनेत्याच्या प्रेमात? आज दोघंही सिंगल title=
August 17, 2023 | ranvir shorey rumoured on having romantic relationship with pooja bhatt

Ranvir Shorey: बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा रंगते ती म्हणजे कलाकारांच्या अफेअरची. यावेळी अशाच एका अभिनेत्याची आणि अभिनेत्रीची चर्चा आहे. रणवीर शोरे हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. त्यातून त्याच्याही अफेअरची अनेकदा चर्चा ही रंगलेली होती. कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शोरे हे विवाहबंध होते. 2010 साली त्यांनी लग्न केले होते. परंतु त्यानंतर त्यांचे लग्न फार काही टिकले नाही. त्यांचा संसार दहा वर्षे टिकला आणि 2020 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा होती. कोंकणा ही आपल्या अभिनयासाठी आणि लेखन-दिग्दर्शनासाठी ओळखली जाते. रणवीरही सध्या ओटीटीवर आपलं नशीब आजमावतो आहे परंतु रणवीर शोरे आणि भट्ट कुटुंबियांची लेक पूजा भट्ट हे दोघं एकमेकांना डेट करत होते आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते याची बरीच चर्चा रंगलेली होती. 

2003 मध्ये मनीष मखिजाशी लग्न करण्यापुर्वी पूजा भट्ट ही रणवीर शोरेसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यावेळी ते दोघं एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यानंतर त्यांच्या नात्यात अनेकदा कटूता निर्माण होत होती. ते एकमेकांना मारहाण करत होते अशीही चर्चा होती. तेव्हा रणवीर आणि पूजा भट्ट एकमेकांशी मारहाण करायचे अशी चर्चा रंगलेली होती. त्यामुळे त्यांचे नाते हे फार काळ काही टिकले नाही. अशावेळी त्यांची बऱ्याच प्रमाणात चर्चा होती. याची चर्चा आजही होताना दिसते आहे. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणवीर शोरे आणि पूजा भट्टची. 

हेही वाचा : VIDEO: 'निसा नाही ही तर नशा' पार्टीतून बाहेर येतानाच अजय देवगणची लेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर

पूजा भट्ट हिच्या अफेअरचीही अनेकदा चर्चा रंगलेली होती. मनीष मखिजापासून तिनंही घटस्फोट घेतला असून ती आता सिंगल आहे. काही दिवसांपासून ती सलमान खानच्या रिएलिटी शोमध्ये दिसली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता रणवीर शोरेही सिंगल आहे. त्यामुळे अद्याप या दोघांच्याही रिलेशिनशिपची चर्चा नाही. 

बॉबी देओल आणि सोहेल खानसोबतही रिलेशनशिपमध्ये होती. त्यातून मध्यंतरी आपले वडील महेश भट्टला किस केल्यानं तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यातून महेश भट्ट एकदा असंही म्हणाले होते की, जर का पूजा भट्ट त्यांची मुलगी नसती तर त्यांनी तिच्यासोबत लग्न केले असते.