'दयाळू..' विजय देवरकोंडासोबतच्या 'त्या' व्हिडीओनंतर रश्मिकाने शेअर केली पोस्ट

नुकतंच, रश्मिका मंदानाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक दयाळूपणावर पोस्ट शेअर केली आहे. सोशल मिडीयावर विजय देवरकोंडा आणि रश्मिकाचा एक निराशाजनक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रश्मिकाने ही पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Feb 6, 2025, 11:45 AM IST
'दयाळू..'  विजय देवरकोंडासोबतच्या 'त्या' व्हिडीओनंतर रश्मिकाने शेअर केली पोस्ट title=

Rasmika Mandana on Instagram: तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सध्या तिच्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनली आहे. दक्षिणात्य सिनेसृष्टीत बरेच हीट चित्रपट दिल्यानंतर आता या अभिनेत्रीने बॉलिवूड सिनेसृष्टीत सुद्धा आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. 'पुष्पा' या बॉक्स ऑफिसवरील हीट चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी रश्मिका नुकतंच, बुधवारी संध्याकाळी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर सक्रिय असल्याचं दिसून आलं. यादरम्यान तिने तिथे दयाळूपणावर एक वेगळीच टीप लिहिली. यावेळी रश्मिकाने आपले फोटोज शेअर करत प्रत्येकाला एकमेकांशी दयाळूपणे वागण्याचे आवाहन केले.

रश्मिका आणि विजयचा व्हिडीओ व्हायरल

खरंतर, सोशल मीडियावर रश्मिका मंदान्ना आणि सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता तसेच तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा यांचा व्हिडिओ समोर आला होता. आणि विशेष म्हणजे, हा व्हिडीओ शेअर केल्याच्या  काही तासांनंतर रश्मिकाने दयाळूपणावर कमेंट केल्याचे दिसून आले. रश्मिका आणि विजयच्या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी निराशा व्यक्त केली आहे. 

 

व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

रेडिटवर शेअर केलेला रश्मिका आणि विजयचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या क्लिपमध्ये विजय आणि रश्मिका एका स्टोअरमधून बाहेर पडताना दिसले. स्टोअरमधून बाहेर पडल्यानंतर विजय लगेचच त्याच्या गाडीकडे गेला आणि आत बसला. तसेच, रश्मिकाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला चालताना अडचणी येत असल्याचंसुद्धा या व्हिडीओमधून दिसलं. 12 जानेवारी रोजी रश्मिका जीममध्ये व्यायाम करत असताना तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, धडपडत चालणाऱ्या रश्मिकाला विजय देवरकोंडाने मदतही केली नसल्याचे पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. व्हिडिओ शेअर झाल्यानंतर लगेच, अनेक सोशल मीडिया नेटकऱ्यांनी त्यावर निराशाजनक प्रतिक्रिया दिल्या आणि विजयला 'असंवेदनशील' असे म्हटले. “रश्मिकाला गाडीत बसायला मदतही करू शकला नाही?अरेरे!" . अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावर पाहायला मिळाल्या. 

रश्मिकाची 'छावा' चित्रपटासाठी तयारी

रश्मिका आणि बॉलिवूड अभिनेता विकी कौशल यांचा 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रश्मिका सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचे चित्रण असलेला हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.