'लाचार आहे...' अनप्रोफेशनल म्हटल्यावर गुरुचरण सिंग यांनी व्यक्त केलं दुःख, 12 वर्षांपासून TMKOC सोबत जोडलेला

Gurcharan Singh: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध टीव्ही शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता गुरचरण सिंग गेल्या काही काळापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. अलीकडेच, एका मुलाखतीत, त्याने खुलासा केला की शोमध्ये बरीच वर्षे देऊनही, त्याला अजूनही अव्यावसायिक म्हटले जात आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 6, 2025, 10:27 AM IST
'लाचार आहे...' अनप्रोफेशनल म्हटल्यावर गुरुचरण सिंग यांनी व्यक्त केलं दुःख, 12 वर्षांपासून TMKOC सोबत जोडलेला  title=

Gurcharan Singh On Called Unprofessional: टीव्हीवरील सर्वाधिक पाहिलेला आणि आवडता शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये रोशन सोधीची भूमिका साकारणारा गुरचरण सिंग सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. काही काळापूर्वी त्याची प्रकृती इतकी बिघडली की, त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. आता त्याची तब्येत पूर्णपणे ठीक आहे आणि तो पुन्हा टीव्हीवर काम करु इच्छित आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्याने व्यावसायिक आयुष्याबद्दल पसरलेल्या अफवांबद्दल सांगितलं आहे. 

काही माध्यमांमध्ये त्याच्याबद्दल अपफ्रोशनल असल्याबद्दल चर्चा सुरु झाली असून त्याला खूप वाईट वाटले. त्याने सांगितले की, या शोसाठी 13-14 वर्षे दिली आणि खूप मेहनत घेतली. गंभीर आजारी असताना आणि रुग्णालयात दाखल असतानाही त्याने आपली जबाबदारी पार पाडली. अशा परिस्थितीत त्याच्याबद्दल चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. त्यामुळे त्याला त्रास होत असल्याच सांगण्यात येत आहे. गुरुचरण पुढे म्हणाले की, अशा नकारात्मक बातम्यांमधून बाहेर पडण्यासाठी अध्यात्माने खूप मदत केली.

अनप्रोफेशनल असल्याची चर्चा 

जेव्हा त्याने बातमी वाचली, तेव्हा त्याने सर्वात आधी शोचे क्रिएटिव्ह हेड सोहेलशी संपर्क साधला आणि विचारले की त्याच्यासोबत असे काही घडले आहे का? सोहेलने हे वक्तव्य चुकीचे म्हटले आणि असे काहीही घडले नसल्याचे सांगितले. यानंतर, गुरुचरणने त्याला एक लाईव्ह सेशन करण्यास सांगितले ज्यामध्ये तो एक व्यावसायिक अभिनेता आहे हे स्पष्ट करता येईल. सोहेलने यावर सहमती दर्शवली आणि दोघांनीही लाईव्ह व्हिडिओद्वारे सत्य सर्वांना सांगितले. गुरुचरण म्हणाले की, त्यांच्यासाठी काम हीच पूजा आहे आणि कोणाबद्दलही खोट्या गोष्टी पसरवणे चुकीचे आहे.

गेल्या वर्षी झाला होता बेपत्ता 

काही महिन्यांपूर्वी, गुरचरण सिंग बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. तो 22 एप्रिल 2024 रोजी दिल्लीहून मुंबईला निघाला, पण तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा फोन बंद झाला. जेव्हा कुटुंब त्याच्याशी संपर्क साधू शकले नाही, तेव्हा त्याच्या वडिलांनी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली. या बातमीने त्याचे चाहते आणि मित्र खूप चिंतेत पडले होते. तीन आठवड्यांनंतर, गुरुचरण अचानक घरी परतला आणि त्याने पोलिसांना सांगितले की तो अध्यात्माच्या शोधात गेला आहे.