'पुष्पा 2' मध्ये रश्मिका मंदान्नाला 'जोर का झटका', सुकुमारने उचललं मोठं पाऊल

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत. 

Updated: Jun 18, 2022, 06:57 PM IST
'पुष्पा 2' मध्ये रश्मिका मंदान्नाला 'जोर का झटका', सुकुमारने उचललं मोठं पाऊल title=

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत. 300 कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग चाहत्यांना खूप आवडला होता. हिंदी व्हर्जनमध्येही या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात अल्लू अर्जुनचं पात्र 'पुष्पराज' आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचे पात्र 'श्रीवल्ली' प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. दरम्यान, आता रश्मिका मंदान्नाबाबत एक बातमी समोर येत आहे.

दिग्दर्शक सुकुमारने पुष्पा 2 मधील अभिनेत्री रश्मिका मंदान्ना 'श्रीवल्ली'ची व्यक्तिरेखा लहान केल्याची चर्चा आहे. वृत्तानुसार, निर्मात्यांनी आता चित्रपटातील तिचं पात्र लहान केलं आहे. याचं कारण म्हणजे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अल्लू अर्जुनच्या पुष्पा राजच्या व्यक्तिरेखेच्या उदयाची कथा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे रश्मिका मंदान्नाच्या भूमिकेची चर्चा रंगत आहे.

पुष्पा-द राइजच्या यशानंतर, टीमला वाटलं की स्क्रिप्टमध्ये अनेक बदल आवश्यक आहेत. त्यामुळेच सुकुमार चित्रपटाच्या कथेच्या पुनर्लेखनात व्यस्त होते, पण नंतर असं वृत्त आलं की त्यांनी आधी तयार केलेल्या कथेवर काम करणार आहे. जी हिंदी प्रेक्षकांसाठी बनवण्यात आली आहे. पुष्पा २ मध्ये सिनेसृष्टीतील मोठे कलाकार दिसणार असल्याचंही बोललं जात आहे.

त्याचबरोबर, पुष्पा 2 बद्दल बातमी आली आहे, निर्मात्यांनी चित्रपटाचेृं बजेट देखील सेट केलं आहे आणि जुलैच्या शेवटी सिनेमाच शूटिंग सुरू होणार आहे. इतकंच नाही तर अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, चित्रपटाच्या पहिल्या भागानुसार, त्याचा दुसरा भाग खूप जबरदस्त असेल आणि पहिल्या भागाच्या तुलनेत या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळेल.