अमिताभ बच्चन यांच्या बाबत रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य म्हणाली, मी घाबरली होती...

यावेळी तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे

Updated: Sep 17, 2022, 06:40 PM IST
अमिताभ बच्चन यांच्या बाबत रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य म्हणाली, मी घाबरली होती... title=

मुंबई : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अमिताभ बच्चन आणि नीना गुप्तासोबत बॉलिवूडला गुडबाय सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर यापूर्वीच रिलीज झाला आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट खूपच भावूक दिसत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

यादरम्यान चित्रपटाचं हिक गाणंही लाँच करण्यात आलंय. ज्यासाठी रश्मिका दिल्लीत आली होती. यावेळी तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्याचवेळी तिने सांगितलं की, जेव्हा ती पहिल्यांदा त्यांना भेटली तेव्हा ती घाबरली होती.

माध्यमांशी संवाद साधताना रश्मिकाने सांगितलं की, "बच्चन सरांसोबत काम करणं खूप छान होतं. मला बच्चन सरांसोबत माझा पहिला हिंदी चित्रपट करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. रश्मिकाने अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून संबोधलं."

रश्मिका अमिताभ यांना भेटायला घाबरली होती
जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, तिची अमिताभ बच्चनसोबतची पहिली भेट कशी होती, यावर रश्मिका म्हणाली, "जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यांची संपूर्ण आभा पाहून मला खूप भीती वाटली. पण ते खूप छान माणूस आहेत. मी त्यांना शूटिंग दरम्यान चांगलं ओळखलं"

बच्चन सरांकडून खूप काही शिकायला मिळालं
रश्मिकाने सांगितलं की, मी स्पंजसारखी आहे. मी माझ्या सहकलाकाराची प्रतिभा आत्मसात करते. गुडबायच्या आधीची रश्मिका आणि गुडबाय नंतरची रश्मिका पूर्णपणे वेगळी आहे आणि त्यात बच्चन सरांची भूमिका मोठी आहे.