मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री रेखा आपल्या ग्लॅमरस लूक आणि उत्तम अभिनयामुळे ओळखली जाते. 70 ते 80 च्या दशकातील लीडिंग अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून रेखा ओळखली जाते. रेखा करिअरमध्ये चॅलेंजिंग रोल्स स्विकारण्यास कधीच कमी पडली नाही. मात्र रेखाचा हा संघर्ष अगदी बालपणापासूनच सुरू आहे.
पूर्वीच्या एका मुलाखतीत रेखाने तिच्या बालपणाबद्दल सांगितल, ती म्हणाली की, रेखाच्या वडिलांनी कधीच तिची दखल घेतली नाही. रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी तामिळ आणि तेलुगु अभिनेते जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांच्या घरी झाला.
रेखाचे वडील जेमिनी यांनी चार वेळा लग्न केले. पण रेखा आणि तिच्या आईसोबत ते कधीच जास्त राहिले नाहीत. रेखा लहान असताना ते वेगळे झाले. रेखाची आई घराची एकमेव कमावणारी होती. मात्र, आर्थिक अडचणींमुळे रेखाला चित्रपटात काम करण्यासाठी 9 वीत असताना शाळा सोडावी लागली.
सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत रेखाने तिचे बालपण 'उत्तम' असल्याचे सांगितले होते. जेव्हा सिमीने तिच्या आई -वडिलांशी तिचे नाते कसे होते, असे विचारले तेव्हा रेखा म्हणाली होती, "त्यांच नातं अतिशय रोमँटिक होतं. ते जे काही दिवस होते एकत्र होते ते नातं अतिशय सुंदर होतं.
रेखाला तिच्या वडिलांच्या काय आठवणी आठवतात ते विचारलं असता अभिनेत्री म्हणाली, "मी लहान होते जेव्हा ते माझ्या आयुष्यातून निघून गेले. मला ती वेळ देखील आठवत नाही. जेव्हा ते घरी होते. तेव्हा माझी आई पूर्णपणे त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
रेखाने पुढे सांगितले होते की तिच्या वडिलांना बरीच मुले आहेत आणि हेच कारण आहे की त्याने तिची कधीच दखल घेतली नाही. रेखा म्हणाली, 'सर्व मुले एकाच शाळेत होती.
कधीकधी असे घडायचे की ते इतर मुलांना शाळेत सोडायला यायचे. तेव्हा त्यांची आणि माझी गाठभेट व्हायची. हीच त्यांची आठवण माझ्याकडे आहे. मला अनेकदा वाटायचं हे माझे अप्पा आहेत पण त्यांना भेटण्याची संधी कधीच मिळाली नाही. मला वाटत नाही की त्यांनी कधी माझी दखल घेतली आहे. त्यांनी मला कधीच पाहिले नाही. '