Mukesh Ambani Video : कोणत्याही पतीसाठी त्याच्या पत्नीनं समाजात एक वेगळी ओळख निर्माण करून इतरांसाठी आदर्श प्रस्थापित करण्याची बाब कौतुकास्पदच असते. स्वावलंबी होणाऱ्या पत्नीला पावलोपावली साथ देणारे असे अनेक पती आपण पाहिले असतील. ज्यांनी चांगल्या आणि वाईट काळातही पत्नीला साथ दिली आणि तिचा आत्मविश्वास डगमगू दिला नाही. उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मुकेश अंबानी हेसुद्धा त्यातलेच एक.
पत्नी, नीता अंबानी (Nita Ambani) यांना पावलोपावली साथ देत त्यांना विविध क्षेत्रांमध्ये पुढे जाताना पाहून मुकेश अंबानी यांनी कायमच त्यांना साथ दिली, त्यांच्या यशाचं कौतुक केलं. एका अर्थी मुकेश अंबानी यांनी इतर पतींसाठी आदर्शच प्रस्थापित केला आहे. पण, आता हेच मुकेश अंबानी काहीसे गडबडले आणि नेटकऱ्यांनी अतिशय गोड प्रतिक्रिया देत, Men Will Be Men... हेच उदगार काढले. सोशल मीडियावर सध्या या क्षणांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला त्यावेळी नेमकं काय घडलं याची कल्पना येईल.
नुकत्याच सुरु झालेल्या Nita Mukesh Ambani Cultural Centre अर्थात NMACC च्या उदघाटन सोहळ्यानंतर या ठिकाणाची बरीच चर्चा झाली. जागतिक स्तरावर नावाजल्या गेलेल्या या NMACC ला सुरुवातीलाच मिळालेलं यश पाहता त्यानिमित्तानं सर्व सहभागी आणि अर्थातच पत्नीच्या मेहनतीला दाद देण्यासाठी मुकेश अंबानी यांनी पुढाकार घेतला.
व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार सेलिब्रिटी पाहुण्यांच्या उपस्थितीत मुकेश अंबानी त्यांच्या पत्नीचं कौतुक करताना दिसले. समोरच एका टेबलर ठेवलेला केक कापण्यासाठी तिथं लगबग सुरु होती. तितक्यातच नीता अंबानी म्हणाल्या, ''Okay what shall we sing”. पुढच्याच क्षणाला मुकेश अंबानी यांनी “Congratulations and celebrations” हे गीत गाण्यास सुरुवात केली. बरं, हे गाणं तुम्हीआम्ही सर्वजण म्हणतो खरं. पण, या दोन शब्दांच्या पुढे नेमकी कोणती ओळ हे आपल्यापैकी फार कमीजणांना लक्षात आहे. अंबानीही त्याला अपवाद ठरले नाहीत. मग काय, तिथं असणाऱ्या नीता आणि ईशा अंबानीलाही हसू आलं. पण, लगेचच सर्वांनी टाळ्यांनी साथ देत ठेक्याच्या आधारे गाणं पूर्ण केलं. थोडक्यात काय, तर गाण्याच्या मागच्या भावना महत्त्वाच्या.
मुकेश अंबानी यांनी पत्नीचं कौतुक केल्यानंतर तिथं असणाऱ्या मराठमोळ्या संगीतकार जोडीतील अजय गोगावले याला नीता अंबानीनी गाणं गाण्याची विनंती केली. त्यानंही 'एकदंताय वक्रतुंडाय...'चे सूर छेडत सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत असून, अनेकांनाच मुकेश अंबानी यांचा साधेपणा आणि पत्नीप्रती त्यांच्या मनात असणारा आदर भावतोय.