मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांची लव्हस्टोरी सगळ्यांनाच तोंडपाठ आहे. बऱ्याचदा मोठ-मोठ्या बॉलिवूड इव्हेंटला हे कपल एकत्र हजेरी लावताना दिसतं. आता तर दोन्ही कुटुंबानेही हे नातं स्वीकारलं आहे. आलिया आणि रणबीर गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकणार होती, पण कोरोनामुळे लग्नाचं प्लॅनिंग पुढे ढकललं.
दोघाचं लग्न जरी अद्याप झालेलं नसलं तरी नीतू कपूर यांनी आधीच आलियाला सून म्हणून स्वीकारलं आहे. कपूर फॅमिलीच्या प्रत्येक फॅमिली फक्शनमध्ये आलिया सामील होते. आता रणबीरची बहीण रिद्धिमा साहनी कपूर आपल्या होणाऱ्या वहिनीबद्दल बोलली आहे. माझी आई तिच्या सूनेला अगदी राणीसारखं ठेवणार, असं ती म्हणाली.
एका मुलाखतीत रिद्धिमा म्हणाली," माझी आई नीतू कपूर खूप चांगल्या स्वभावाची आहे. ती खूप चांगली सासू बनणार, हे मी दाव्यानं सांगू शकते. तिला लोकांच्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करायला आवडत नाही. त्यामुळे निश्चितपणे ती रणबीर व आलियाच्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ करणार नाही. त्यांना पुरेसी स्पेस देईल. माझी आई सूनेचे इतके लाड करेल की, सूनबाई या लाडानंच बिघडतील, असे रिद्धिमा म्हणाली.
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर एकट्या राहत आहेत. मुलगी रिद्धिमा कपूर दिल्लीला राहते आणि रणबीर कपूर तर त्याची लेडी लव्ह आलिया भटसोबत सर्वांत जास्त दिसून येतो. मध्यंतरी आईला एकटं सोडून आलियासोबत राहायला गेल्यामुळे रणबीर ट्रोल देखील झाला होता. पण नीतू यांनी एकटं राहण्याचा निर्णय माझा स्वत:चा असल्याचं म्हटलं. पुढे त्या एकटेपणाची मला सवय झाली. ते येतात तेव्हा मला आनंद होतो असं ही त्यांनी म्हटलंय.