पाहा लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा खास दोस्त; सारं जग बदललं तरी अभिनेत्यासाठी तो तिथेच...

दोस्त असावा तर असा   

Updated: Jan 11, 2022, 11:18 AM IST
पाहा लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा खास दोस्त; सारं जग बदललं तरी अभिनेत्यासाठी तो तिथेच...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी आणि मराठी कलाविश्वाला जोडणारा एक सुरेख आणि सर्वांनाच आपलासा वाटणारा दुवा म्हणजे अभिनेता रितेश देशमुख. हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साराकरत लोकप्रिय झालेला आणि सोबतच मराठी चित्रपटातही गाजलेला रितेश विविध कारणांसाठी चर्चेत असतो. (riteish deshmukh )

त्यातही मुळात तो महाराष्ट्राचा सुपुत्र असल्यामुळं त्याच्यावर मराठी भाषिक प्रेक्षकांचं विशेष प्रेम. 

रितेश आज त्याच्या कारकिर्दीत बराच पुढे गेला आहे. जीवनात यशाच्या मार्गावर चालू लागला आहे. असं असताना तो आपली पाळंमुळं विसरलेला नाही. 

सोशल मीडियावर त्यानं केलेली पोस्ट पाहून याचा सहज अंदाज लावता येत आहे. 

बाभळगाव, लातूर येथील एका खास दोस्तासोबतचा फोटो रितेशनं पोस्ट केला आहे. 

प्रकाश इरेकर असं त्याच्या या मित्राचं नाव. त्याचा वाढदिवस असल्या कारणानं रितेशनं हा फोटो शेअर केला. 

'वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रकाश इरेकर. हा बाभळगाव, लातूर या माझ्या गावातील माझा खास मित्र. अनेक वर्ष उलटली, पण आमची मैत्री मात्र कायम तिथेच तग धरुन राहिलीये', असं त्यानं या भावनिक पोस्टमध्ये लिहिलं. 

जीवनात कितीही पुढे गेलो तरीही काही व्यक्ती मात्र आपल्यासाठी कधीही बदलत नाहीत. त्यांचं जीवनातील स्थान हे कायम अबाधित असतं. 

रितेशसाठी प्रकाश इरेकर हा त्याचा मित्र अशाच व्यक्तींपैकी एक, हे आम्ही नाही तर त्याचेच शब्द सांगत आहेत. 

रितेश आणि प्रकाशची मैत्री पाहता, खरंच म्हणावंसं वाटतंय 'दोस्त असावा तर असा....'