मुंबई : 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घरघरात पोहोचलेले सखी गोखले आणि सुव्रत जोशी या दोघांनी काढलेला टॅटू सध्या चर्चेचा विषय आहे. या दोघांनी कपल गोल ठरवून हा टॅटू काढला आहे. वर्षभरापूर्वीच ही दोघं लग्नबंधनात अडकली.
लग्नानंतर सुव्रत आणि सखी लाँग डिस्टंट रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. सखी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेत आहे तर सुव्रत मुंबई-पुणे इथे असतो. सखी ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये भारतात आली असून या दोघांनी नवा टॅटू गोंदवला आहे. या दोघांचा टॅटू सारखाच असून सखीने याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
नक्षत्र, दिवस-रात्र, युनिव्हर्स यांचं प्रतिक असा हा टॅटू आहे. सुव्रतने आपल्या डाव्या हातावर तर सखीने आपल्या मानेखाली, पाठीवर हा टॅटू काढला आहे. सखीचा पाचवा टॅटू आहे. या अगोदर सखीने चार टॅटू काढले आहेत. पहिला टॅटू हा फुलपाखराचा आहे. दुसरा टॅटू तिच्या असून आईचं नाव आहे. तिसरा टॅटू उडणारे पक्षी आहेत. तर चौथा टॅटू हा तिच्या शाळेचा टॅटू आहे.
सखी-सुव्रत एप्रिल 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले. दोघांनी अतिशय खासगी आणि साधेपणाने हा सोहळा पार पाडला. आमराईत सखी-सुव्रतचं लग्न संपन्न झालं.