Sakshi Tanwar Birthday : सोज्वळ सूनेची भूमिकेत दिसणाऱ्या साक्षीनं दिला 17 मिनिटांचा इंटीमेट सीन अन्...

Sakshi Tanwar चा आज 50 वा वाढदिवस आहे. साक्षीनं छोट्या पडद्यावर हा इंटीमेट सीननं देत सगळ्या हद्द पार केल्या होत्या...

Updated: Jan 12, 2023, 04:41 PM IST
Sakshi Tanwar Birthday : सोज्वळ सूनेची भूमिकेत दिसणाऱ्या साक्षीनं दिला 17 मिनिटांचा इंटीमेट सीन अन्... title=

Sakshi Tanwar Birthday : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वरनं ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साक्षीचा आज 12 जानेवारी 2023 रोजी 50 वा वाढदिवस आहे. साक्षीनं फक्त तिच्या सुंदरतेनं नाही तर तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. एकता कपूरच्या (Ekta Kapoor)  'बडे अच्छे लगते हैं' (Bade Acche Lagte Hain) मालिकेत साक्षी तन्वरनं (Sakshi Tanwar) अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) सोबत तब्बल 17 मिनिटे इंटीमेट सीन दिला होता. असा सीन टीव्हीच्या दुनियेवर पहिल्यांदाच चित्रित करण्यात आला होता. इतकंच काय तर इतरांनी इतकं देखील म्हटलं होतं की संपूर्ण कुटूंबासोबत बसून टीव्ही पाहता येत नाही. 

मालिकांमध्ये इतके मोठे इंटीमेट सीन दाखवले जात नाहीत, मात्र, 'बडे अच्छे लगते है' मालिकेत राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यात इंटीमेट सीन (Sakshi Tanvar Ram Kapoor Intemate Scenes) दाखवण्यात आले होते. ऑनस्क्रीन किसिंग पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.  राम-साक्षी यांच्यातील या 17 मिनिटांच्या लव्ह मेकिंग आणि किसिंग सीनमुळे शोनं एकीकडे टीआरपी रँकिंगमध्ये उडी घेतली होती. तर, दुसरीकडे त्यावर टीका करण्यात येत आहे. दोघांमधील लिपलॉक सीनमुळेही नवा वाद सुरू झाला.

साक्षी या इंटीमेट सीनवर म्हणाली की, 'या सीनवर गरज नसताना उगाच इतका गोंधळ केला जात आहे. हा सीन करण्यापूर्वी साक्षीनं तिच्या कुटुंबीयांशी चर्चा केली होती. त्यावर तिच्या घरच्यांनी हा सीन देऊ नको हे सांगितले होते, परंतु तिला हे मान्य नव्हतं आणि तिनं हा सीन शूट केला.

हेही वाचा : Actress Pregnant Before Marriage : लग्नाच्या आधीच प्रेग्नंट होत्या 'या' 5 लोकप्रिय अभिनेत्री!

हा इंटिमेट सीन व्हायरल झाल्यानंतर शोच्या निर्मात्या एकता कपूरची खिल्ली उडवण्यात आली. 'डर्टी पिक्चर' हिट झाला तर आता टीव्ही सीरियलमध्येही घाण पसरवतील, असे टोमणे देखील मारले आहेत. राम कपूर यांना घर एक मंदिर या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली होती पण ते प्रसिद्ध 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून मिळाली. त्यानंतर त्यांनी बऱ्याच मालिकांमध्ये काम केले.

मालिकांमध्ये काम करत असताना रामला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. 'कुछ कुछ लोचा है', 'स्टुडंट ऑफ द इयर', 'एजंट विनोद', 'हमशकल्स', 'मान्सून वेडिंग', 'कार्तिक कॉलिंग कार्तिक', 'उडान', 'मेरे डॅड की मारुती', 'लव्ह यात्री', 'थप्पड' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.