बापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत

Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असणारा धोका पाहता एकिकडे तपास सुरू असतानाच दुसरीकडे चर्चेत आलीये एक नवी बाब.   

सायली पाटील | Updated: Oct 17, 2024, 02:12 PM IST
बापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत title=
salman Khan Murder Planning Lawrence Bishnoi Gang deployes 60 to 70 people shocking news

Bishnoi Gang Threat to Salman Khan : माजी राज्यमंत्री आणि राजकीय वर्तुळातील एक मोठं नाव असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिष्णोई गँग आणि त्यांची कलाजगतावर असणारी वक्रदृष्टी हे चर्चेचे मुद्दे ठरत असल्याचं पाहायला मिळालं. सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या बिष्णोई गँगची भूमिका आणि त्यांच्याकडून अभिनेत्याला येणाऱ्या धमक्या पाहता तणावात पुन्हा एकदा भर पडल्याचं पाहायला मिळत आहे. 

सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला या गँगपासून असणारा धोका पाहता सर्व परिंनी सावधगिरी बाळगली जात आहे. त्याच धर्तीवर अभिनेत्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सलमानच्या हत्येसाठी प्रयक्न करणाऱ्या आरोपींकडून नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनं पुन्हा डोकं वर काढलं. सूत्रांच्या माहितीनुसार सलमानला मारण्यासाठी बिष्णोई गँगनं 25 लाख रुपये दिल्याचं या आरोपपत्रात म्हटलं होतं. 

उपलब्ध माहितीनुसार आरोपींनी पाकिस्तानातून M16,  AK 47, AK 92 ची खरेदी करण्याचा बेत आखला होता. सिद्धू मुसेवाला याची ज्या पिस्तुलानं हत्या केली, त्याच पिस्तुलाचा वापर करत सलमानला जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपी करणार होते. इतकंच काय, तर त्यांनी सलमानच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवलं होतं. जवळपास 60 ते 70 लोक त्याच्या घरावर पाळत ठेवून होते. 

हेसुद्धा वाचा : चार मिनिटांचा किसिंग सीन; 91 वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या सीनचा PHOTO व्हायरल 

पोलिसांच्या आरोपपत्रानुसार एप्रिल 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान सलमानच्या हत्येची योजना आखण्यात आली असल्याची नोंदही आरोप पत्रात आढळली. सलमानचं वांद्रे येथील घर, त्याचं पनवेल येथील फार्महाऊस आणि एकंदर त्याच्या वेळापत्रकावर कथित स्वरुपातील या हल्लेखोरांनी नजर ठेवली होती. सलमान खानच्या जीवाला बिष्णोई गँगकडून असणारा धोका पाहता, सिद्दीकी यांच्या निधनानंतर आता बी टाऊनच्या या आघाडीच्या अभिनेत्याच्या सुरक्षिततेही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आता सदर प्रकरणी तपासातून नेमकी कोणती माहिती हाती लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.