हृतिक रोशनबाबत केलेलं 'हे वक्तव्य ऐकून समंथा रुथ प्रभूवर संतापले चाहते

साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Updated: Aug 1, 2022, 07:48 PM IST
हृतिक रोशनबाबत केलेलं 'हे वक्तव्य ऐकून समंथा रुथ प्रभूवर संतापले चाहते title=

मुंबई : साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आजकाल सर्वत्र सामंथाच्या नावाचा बोलबाला आहे. चाहत्यांना तिच्या डान्ससोबतच तिच्या सौंदर्याचंही वेड लागलं आहे. त्याचबरोबर आता या अभिनेत्रीने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनबद्दल एक कमेंट केली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

सामंथा रुथ प्रभूने तिच्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'हे ऐकून लोकं मला मारतील, पण मला हृतिक रोशनचा लूक फारसा आवडत नाही.' यानंतर एका चाहत्याने सामंथा रुथ प्रभूच्या विधानावर कमेंट करत म्हटलं की, 'जेव्हा समंथाने हे विधान केलं होतं, तेव्हा ती खूपच लहान होती.' यासोबत ती पुढे म्हणाली, 'आजच्या काळात हृतिक रोशनला साऊथचे कलाकार प्रभास आणि राम चरण यांच्याप्रमाणेच पसंत केलं जातं.' त्याचबरोबर हृतिक रोशनलाही अभिनेत्रीचं हे वक्तव्य आवडलं नाही. त्यानंतर चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली.

मात्र, आतापर्यंत हृतिक रोशनने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दुसरीकडे, समंथा रुथ प्रभूबद्दल सांगायचं झालं तर, ती अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. ज्यामध्ये ती लवकरच दिसणार आहे. सामंथा शंकुतलम आणि यशोदा या चित्रपटात दिसणार आहे. यासोबत ती विजय देवरकोंडा यांच्या 'कुशी' या चित्रपटात दिसणार आहे. इतकंच नाही तर तिच्या बॉलिवूडमध्ये एंट्री केल्याच्या बातम्याही येत असून लवकरच ती हिंदी चित्रपटांमध्येही काम करणार आहे.

समंथा रुथ प्रभूची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे आणि ती तिच्या सौंदर्यावरही वर्चस्व गाजवते. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटात ती दिसली होती. त्यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली. सामंथा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहते तिच्या एका झलकची वाट पाहत आहेत.