मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने चित्रपटांनी आणि शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'दीवाना' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या शाहरुखने हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख 'बादशाह ऑफ रोमान्स' आणि 'किंग खान' अशी केली. जरी अभिनेत्याला त्याच्या कामासाठी बरीच लोकप्रियता मिळाली, परंतु त्याची लोकप्रियता आणि प्रसिद्धीचा मुलांवर वाईट परिणाम होऊ नये अशी चिंता त्याला कायम सतावत होती. एवढेच नाही तर शाहरुख खानने 'कॉफी विथ करण'मध्ये माझ्या नावामुळे मुलांचे करिअर खराब होऊ शकते , असंही म्हटलं होतं.
शाहरुख खाननेही मुलाखतीदरम्यान आपली सर्वात मोठी भीती सांगितली. अभिनेता म्हणाला होता, "मुलाला आयुष्यात आणण्याचा निर्णय घेणे म्हणजे तुमच्या शरीरातून हृदयाचा तुकडा काढून घेण्यासारखे आहे. अशा प्रकारे मी माझ्या नातेसंबंधांची लोकांशी तुलना करतो. जर माझा एक जवळचा मित्र उभा असेल आणि वेगाने जाणारी गाडी त्याच्या दिशेने जात असेल तर मी उडी मारून त्याचे प्राण वाचवेल."
या संदर्भात शाहरुख खान पुढे म्हणाला की, "माझी पत्नी आणि माझी बहीण एका वेगवान कारसमोर उभ्या आहेत, तर मी त्यांना 100 टक्के खेचून घेईन आणि माझे नुकसान होऊ देईन. जर एखादी वेगवान गाडी माझ्या मुलांकडे जात असेल तर मी त्या गाडीसमोर उभा राहीन. माझ्या मुलांपर्यंत कोणतीचं समस्या येवू देणार नाही. ”
मुलांद्दल चिंता व्यक्त करत शाहरुख म्हणाला, “माझी सर्वात मोठी भीती म्हणजे माझ्या प्रसिद्धीचा त्याच्यावर परिणाम व्हायला नको. माझ्या नावामुळे माझ्या मुलांचे करिअर खराब होऊ शकते आणि मला असे काहीही होऊ द्यायचे नाही. जेव्हा मुलांचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकजण आयुष्यात मागे पडतो. "
सध्या आर्यन खानच्या अटकेमुळे शाहरुख मोठ्या अडचणीत सापडला आहे. 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरूंगात आहे. विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या वकिलांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.