'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करायला आवडेल, 'पण ती नाही मिळाली तर...'; शशांक केतकरचा खुलासा

Shashank Ketkar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शशांक केतकरची. शशांक केतकरनं आपण कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करणार याबद्दल खुलासा केला आहे. त्याच्या उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Dec 1, 2023, 06:18 PM IST
'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करायला आवडेल, 'पण ती नाही मिळाली तर...'; शशांक केतकरचा खुलासा title=
shahshak ketkar opens up about which famous actress she would like to date

Shashank Ketkar : बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या मनातही अशी इच्छा असतेच की आपणही कुण्या मोठ्या अभिनेत्रीला डेट करावे. सध्या अशाच एका अभिनेत्याचे वक्तव्य हे चर्चेत आहे. अभिनेता शशांक केतकरची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यानं त्याला कोणत्या अभिनेत्रीला डेट करायला आवडेल यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नुकतीच त्याची 'स्कॅम 2003' ही वेबसिरिज प्रसिद्ध झाली आहे. त्याची ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं याचा खुलासा केला आहे की त्याला कोणत्या अभिनेत्रीला डेट करायला आवडेल? यावेळी त्याचे उत्तर जाणून घ्यायला तुम्हीही उत्सुक असाल. 

यावेळी शशांक केतकर या अभिनेत्यानं 'अल्ट्रा मराठी बझ' या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी रॅपिड फायरच्या दरम्यान त्याला आपल्या डेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला की, ''डेटच ना लग्न नाही करायचं ना. डेट असेल तर आधी मी आलिया भट्टला ट्राय करेन.

मग ती नाहीच म्हणाली तर कोंकणा सेन शर्मा, सोनाली बेंद्रे. कारण मला नुसतं सौंदर्य नाही तर त्यांचं अभिनय कौशल्य आवडतं.'' म्हणजे थोडक्यात त्याला सोनाली बेंद्रेला डेट करायला आवडेल. सोनाली बेंद्र ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिची आताही चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. आजही तिच्या अभिनयाचे अनेक जणं फॅन्स आहेत. सोनाली मोठ्या आजारातून बाहेर येत आजही तितक्याच ताकदीनं अभिनय करताना दिसते आहे. 

हेही वाचा : बिकीनी, स्विमसूट्स सोडा; टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! हटके फोटो पाहून उडेल झोप

सध्या अभिनेता शशांक केतकर हा 'मुरांबा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याची ही मालिका प्रचंड गाजते आहे. त्यामुळे त्याचीही बरीच चर्चा ही रंगलेली आहे. होणार सुन मी या घरची या मालिकेतून तो घराघरात पोहचला होता.