मुंबई : शक्ती कपूर 'रक्तधार' या आगामी चित्रपटामध्ये एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहेत.
आपल्या समाजामध्ये तृतीयपंथीयांकडे फारसे चांगल्या दृष्टीने पाहिले जात नाही. तो दृष्टीकोन बदलण्यासाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरेल.
'रक्तधार' चित्रपट प्रेम, राजनीती त्याबरोबर भारतीयांनी तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणयाची नेमकी का गरज आहे ? याबद्दल भाष्य करणारा चित्रपट आहे.
समाजामध्ये तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा सकारात्मक करण्यासाठी हा चित्रपट किमान खारीचा वाटा उचलेले अशी भावना चित्रपटाचे दिग्दर्शक अजीत वर्मा यांनी व्यक्त केली आहे. तृतीयपंथीय आजही अनेक मूलभूत गरजांपासून वंचीत आहे. या चित्रपटामुळे त्यांचे आयुष्य थोडे सुकर झाल्यास ते आमच्या चित्रपटाचे यश असेल अशी भावनादेखील वर्मांनी व्यक्त केली आहे.