श्याम बेनेगलच्या सर्वोच्च रेटिंगचे 10 चित्रपट, जे बदलतील आपला दृष्टीकोन

श्याम बेनेगल यांचे दहा सिनेमे असे आहेत ज्यामध्ये त्यांना हायेस्ट रेटिंग मिळाली आहे. त्यांचे हे सिनेमा लोकांचा दृष्टिकोन बदलून टाकतात                                        

Updated: Apr 18, 2021, 05:14 PM IST
श्याम बेनेगलच्या सर्वोच्च रेटिंगचे 10 चित्रपट, जे बदलतील आपला दृष्टीकोन title=

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते शाम बेनेगल हे समाजातील वास्तव्य दाखवणारे निर्माते म्हणून ओळखले जातात. हैदराबादच्या त्रिमुलगिरी भागात 14 डिसेंबर 1934साली जन्मलेल्या शाम बेनेगल यांना सात वेळा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण दादासाहेब फाळके, पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे, श्याम बेनेगल हे बांगलादेशामधील के फादर आफ नेशन मुजीबउर रहमान आणि टीपू सुल्तानचे वंशज यांच्यावर चित्रपट बनवत आहेत. त्यांचे हा दसिनेमा असे आहेत ज्यामध्ये त्यांना हायेस्ट रेटिंग मिळाली आहे. त्यांचे हे सिनेमा लोकांचा दृष्टिकोन बदलून टाकतात                                        

'अंकुर' (ankur the seedling- 1974)                    
श्याम बेनेगल यांनी आपल्या पहिल्या चार सिनेमाच दिग्दर्शन आणि लेखन स्वत: केलं. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच 'अंकुर' हा सिनेमा 1974 मधेय मोठ्या पडद्यावर रिलीज झाला. हा सिनेमा शबाना आजमी यांचाही पहिलाच सिनेमा होता. या सिनेमाला नॅशनल अवॉर्डबरोबर 40 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत या सिनेमाला आठ ते दहा आयएमडीबी रेटिंग मिळालं होतं. हा सिनेमे ॲमेझॉन प्राईम आणि बिजनेस प्लस हॉटस्टार वर दिसू शकतात     

            

कलियुग (kalyug 1981)          
श्याम बेनेगल यांच्या कलियुग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.या चित्रपटात शशि कपूर रेखा आणि राज बब्बर यांच्या मुख्य भूमिका आहेत चित्रपटाला 7.8 ते 10 आय एम.डी.बी रेटींग मिळालं

मंथन-1976                        
मंथन या चित्रपटातून ग्रामीण भारताची कहाणी सांगण्यात आली आहे या चित्रपटात वर्गीस कुरीयनची श्वेतक्रांती सुरुवात आणि यशोगाथा दाखवण्यात आली आहे  मंथन ला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हा सिनेमा भारताच्या वतीने ऑस्करमध्ये पाठवण्यात आला होता. या सिनेमात नसिरुद्दीन शहा स्मिता पाटील गिरीश कर्नाड आणि अनंत नाग यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाला 7.7 ते 10 मिळाला आहे

4- निशांत, रिलीज 1975, 7.6/10 IMDb रेटिंग
5- जूनून, रिलीज 1979, 7.6/10 IMDb रेटिंग
6- मंडी, रिलीज 1983, 7.6/10 IMDb रेटिंग
7- नेताजी सुभाष चंद्र बोस रिलीज 2005, 7.5/10 IMDb रेटिंग
8- भूमिका रिलीज 1977, 7.5/10 IMDb रेटिंग
9- आरोहन रिलीज 1983, 7.5/10 IMDb रेटिंग
10 त्रिकाल रिलीज 1985, 7/10 IMDb रेटिंग