नाचता-नाचता गेला सोनाली कुलकर्णीचा तोल; पुढे जे झालं... व्हिडिओ व्हायरल

 ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगात मैत्रीचा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग यामध्ये सेलिब्रिटी कसे मागे राहतील. सेलिब्रिटी सुद्धा त्यांचा फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. 

Updated: Aug 6, 2023, 02:00 PM IST
नाचता-नाचता गेला सोनाली कुलकर्णीचा तोल; पुढे जे झालं... व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगात मैत्रीचा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग यामध्ये सेलिब्रिटी कसे मागे राहतील. सेलिब्रिटी सुद्धा त्यांचा फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. आपल्या सोशल मीडियावर आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत फोटो व्हिडिओ शेअर करुन सेलिब्रिटी आपला हा खास दिवस साजरा करत आहेत. नुकताच सोनाली कुलकर्णीने तिच्या सोशल मीडियावर फ्रेंडशिप डे निमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये सोनालीसोबत नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकर दिसत आहे. या दोघांची मैत्री कुणापासून लपून नाही. या दोघांच्या मैत्रिची गोड झलक सोनालीने इन्स्टावर शेअर केलीये. शेअर केलेल्या या व्हिडिओला सोनालीने कॅप्शन दिलं आहे की, हर एक friend ज़रूरी होता है…. A friend I can dance my heart out with'' यादो की अलमारी या गाण्यावर हे रिल बनवलं आहे. या BTS व्हिडिओच्या सुरुवातीलाच सोनाली आणि फुलवा डान्स करताना दिसत आहेत. नंतर सोनाली खाली वाळूत पडते. यानंतर दोघीही जोर-जोरात हसू लागतात. मग पुन्हा या दोघी डान्स करु लागतात. यानंतर सोनाली खाली लोळून डान्स करु लागते. यावेळी दोघींही खूप धमाल करताना दिसत आहे. सोनाली आणि फुलवाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

त्याच्या या व्हिडिओवर युजर्सही लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सोनालीची खास मैत्रिण सई ताम्हणकरनेही या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलंय की, आज आहे तुझ्या माहितीसाठी! फक्त मैत्री दिनाच्या शुभेच्छा चिऊ; आय लव्ह यू, तर अजून एका युजर्सने कमेंट करत लिहीलंय की, फुलवा बारिक दिसतेय. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, तुम्ही दोघीही चांगले फ्रेंड्स आहात. नेहमी एकत्र नाचत असता. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, तुम्ही आम्हांला आयुष्य मजेत जगण्यासाठी नेहमीच प्रेरणा देता. तर अनेकांनी यांच्या मैत्रिच्या या व्हिडिओवर त्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनाली आणि फुलवा अनेकदा एकमेकींसोबत व्हिडिओ शेअर करत असतात. याआधीही या दोघींनी डान्सचे व्हडिओ शेअर केले आहेत.  मात्र यावेळी फ्रेंडशिप डे निमीत्त शेअर केलेला व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.