परफॉर्म करत असतानाच स्टेजवर आला चाहता, बाऊन्सर मारहाण करत असतानाही सोनू निगम गात राहिला, नेटकरी संतापले

Sonu Nigam : सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये जे काही झालं ते पाहून सगळ्यांना बसला धक्का... 

दिक्षा पाटील | Updated: Oct 29, 2024, 07:33 PM IST
परफॉर्म करत असतानाच स्टेजवर आला चाहता, बाऊन्सर मारहाण करत असतानाही सोनू निगम गात राहिला, नेटकरी संतापले title=
(Photo Credit : Social Media)

Sonu Nigam : लोकप्रिय संगीतकार सोनू निगमची गाणी आजही अनेक लोक ऐकतात. त्याच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात जागा करून आहे. त्यामुळेच त्याच्या कॉन्सर्टला आजही गर्दी असते. त्यांची गाणी ऐकायला आजही लोकांना फार आवडतं. दरम्यान, त्याच्या नुकत्याच एका कॉन्सर्टमध्ये असं काही झालं ज्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. खरंतर झालं असं की तो परफॉर्म करत असताना एक व्यक्ती स्टेजवर आली. मात्र, त्यानंतर स्टेजवर जे काही झालं ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. 

सोनू निगमच्या एका फॅन क्लबनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत सोनू निगम हा त्याच्या बॅन्डसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसला. त्यावेळी परफॉर्म करताना असं काही घडलं की जे पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. सोनू स्टेजवर गातोय आणि त्यावेळीच एक माणूस स्टेजवर येतो आणि तो सोनू निगमच्या दिशेनं पुढे सरकताना दिसतो. तो काही करू शकणार या आधीच स्टेजवर सिक्योरिटी आणि बाऊंसर्स लगेच त्याच्या दिशेनं धावतात. त्यानंतर ते त्याला मारताना दिसतात. इतकंच नाही तर ते तिथेच थांबत नाहीत तर त्याला मारत मारत स्टेज खाली घेऊन जातात. मजेशीर गोष्ट ही आहे की हे सगळं स्टेजवर सुरु असताना सोनूनं त्याच्या गाण्याची रिदम सोडली नाही आणि तो गातच राहिला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सोनू निगमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी विविध कमेंट करताना दिसत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'सोनू निगम सर आजही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. त्या माणसाला पाहून ते बाजूनेच निघून गेले आणि गात राहिले. इतकं झालं तरी त्याच्या सुरांची रेंज काही चुकली नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हे सगळ्यात भारी होतं. म्हणजे स्टेजवर इतकं काही सुरु असताना तिकडे कोणाचं लक्ष जाऊ नये किंवा स्वत:च्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ नये यासाठी सगळं कसं सांभाळून घेतलं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हे खरंच खूप भारी होतं. सोनू निगमनं कसं काय त्या माणसाकडे दुर्लक्ष केलं आणि तरी गात राहिला? खरंच तो यासाठीच ग्रेट आहे असं म्हणतात.'  दरम्यान, काही नेटकऱ्यांना हे आवडलं तर काही नेटकऱ्यांना हे पटलेलं नाही. एक नेटकरी म्हणाला, काहीही असो त्याला मारायला नको हवं होतं. दुसरा नेटकरी म्हणाला, तो काय सोनू निगमसोबत खेळायला आला नव्हता.