सनी लिओनीने अपघातात तिचा सुंदर चेहरा गमावला? व्हिडिओ पाहून सगळेच हादरले

सनीचा हा व्हिडिओ 16 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे

Updated: Mar 6, 2022, 03:13 PM IST
 सनी लिओनीने अपघातात तिचा सुंदर चेहरा गमावला? व्हिडिओ पाहून सगळेच हादरले title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज काहीतरी शेअर करत असते. आपल्या ग्लॅमरने सर्वांची मनं जिंकणाऱ्या सनीचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तिचे चाहते हादरले आहेत. व्हिडिओमध्ये सनीच्या चेहऱ्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे.

अभिनेत्रीची अशी अवस्था पाहून चाहते दु:खी झाले आहे आणि तिला तिच्या प्रकृतीबद्दल विचारत आहेत.

सनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिओनीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचं दिसत आहे. तिच्या पाठीलाही दुखापत झाली असून त्यावर कुणीतरी पट्टी लावत असल्याचं बोललं जात आहे. 

व्हिडिओ शेअर करताना सनीने लिहिले - एजंट एम जखमी.. अनामिका मध्ये काय घडले ते जाणून घ्या. 10 मार्च रोजी MX Player वर रिलीज होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनीचा हा व्हिडिओ 16 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका चाहत्याने या व्हिडिओवर रडणारा इमोजी पोस्ट केला.  सनीला खरोखर दुखापत झालेली नाही, हा तिच्या शूटिंगचा एक भाग आहे.