मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुशांत आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हता त्याची हत्या केली असल्याचा खळबळजनक दावा सुशांतच्या मामांनी केला आहे. सुशांतच्या मामांनी पटनामधील त्याच्या घराबाहेर हे वक्तव्य केलं आहे. शिवाय बिहारच्या अनेक बड्या नेत्यांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
We don’t think he committed suicide, police must investigate the matter. There seems to be a conspiracy behind his death. He has been murdered: Maternal uncle of #SushantSinghRajput, outside Sushant's residence in Patna, Bihar. (14.06.2020) pic.twitter.com/aUO80KNZdf
— ANI (@ANI) June 15, 2020
सुशांतचे मामा म्हणाले, 'सुशांतने आत्महत्या केली यावर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपासणी करावी. त्याच्या मृत्यूमागे कट रचल्याची शंका आम्हाला वाटत आहे.' असं ते म्हणाले. सुशांतने त्याच्या वांद्रातल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियननेही आत्महत्या केली होती.
सुशांत सिंह राजपूत ५ ते ६ महिन्यांपासून मनोचिकित्सकाकडून नैराश्यावर उपचार घेत होता. शनिवारी रात्री त्याला अधिक त्रास होऊ लागला. रविवारी त्याने राहत्या घरी हिरव्या रंगाच्या कुर्ताने गळफास लावून घेतल्याचं प्राथमिक अंदाजात स्पष्ट झालं.